आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पश्चिम बंगालमधील अल्पवयीन मुलीस १५ दिवस डांबून ठेवले, दोन जणांनी केला सतत अत्याचार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पश्चिम बंगालमधील एका १७ वर्षीय मुलीस पुण्यात अाणून या ठिकाणी एका खोलीत तब्बल १५ दिवस कोंडून ठेवत तिच्यावर दोन जणांनी बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडितेने आरोपींच्या तावडीतून कशीबशी स्वत:ची सुटका करून पुणे रेल्वेस्टेशनच्या लोहमार्ग पोलिसांना याबाबत माहिती दिल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. 


याप्रकरणी पोलिसांनी जहांगी अंगूर शेख (२५, पश्चिम बंगाल) नामक तरुणास अटक केली असून त्याचा साथीदार असलेला नयन युसूफ शेख (२२) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलगी ही मूळची पश्चिम बंगालमधील असून आरोपींनी तिला पुण्यातील वडगाव शेरी भागातील एका खोलीत डांबले होते. दरम्यान, हे प्रकरण चंदननगर पाेलिसांकडे तपासासाठी वर्ग करण्यात आले असून पोलिस तपास करत अाहेत.

 

बातम्या आणखी आहेत...