आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत युवतीवर बलात्कार: युवतीवरही तरुणाकडून खंडणीचा गुन्हा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - लग्नाचे आमिष देत बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले. या युवतीने लग्नाची मागणी केली असता तिला वेळोवेळी जातिवाचक शिवीगाळ करत आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी पीडित युवतीने केलेल्या तक्रारीनुसार संशयित तरुणाच्या विरोधात बलात्कार आणि अनुसूचित जाती-जमाती कायद्यांतर्गत मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, संशयित तरुणाच्या अाईने उपनगर पाेलिसात संबंधित युवती व एका तरुणावर १५ लाख रुपये न दिल्यास बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी फिर्याद दिली असून पाेलिसांनी याप्रकरणी दाेघांवर गुन्हा दाखल केला अाहे. 


पोलिसांनी दिलेली माहिती व पीडित युवतीने दिलेल्या तक्रारीनुसार २०१७ ते २०१८ या कालावधीत उपनगर परिसरात राहणाऱ्या या पीडित युवतीचे संशयित शुभम आनंद गाडेकर याच्यासोबत प्रेमसंबंध होते. संशयिताने युवतीला लग्नाचे आमिष देत शहरातील हॉटेलमध्ये व मित्राच्या अशोका मार्ग येथील फ्लॅटवर वेळोवेळी नेत बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले. तसेच गुपचूप आक्षेपार्ह फोटो आणि मोबाइलमध्ये व्हिडिओ चित्रीकरण केले.

 

लग्न करण्यासाठी पीडितेने गळ घातली असता संशयिताने जातिवाचक शिवीगाळ करत युवतीला अपमानास्पद वागणूक देत आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिल्याची तक्रार पीडितेने केली. या तक्रारीची दखल घेत सहायक आयुक्त आर. आर. पाटील, वरिष्ठ निरीक्षक विजय ढमाळ यांनी संशयितावर गुन्हा दाखल केला. संशयित फरार असून पाेलिसांकडून त्याचा शाेध सुरू अाहे. 

 

पंधरा लाख न दिल्यास बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी : 
उपनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आणि संगीता आनंद गाडेकर (रा. दत्तमंदिर रोड, नाशिकरोड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, बाळासाहेब बोडके (रा. जेलरोड) आणि संशयित युवती या दोघांनी मिळून १ जून २०१७ ते ७ ऑक्टोबर २०१८ या दरम्यान हा प्रकार घडविला. मुलगा शुभम हा जून २०१७ मध्ये बँकेत गेला असता संशयित युवतीने ओळख झाल्यानंतर तिच्यासोबत विवाह करावा नाही तर १५ लाख रुपये द्यावे. तसेच साथीदार बोडके यास २० लाख रुपये द्यावे अशी मागणी केली. पैसे दिले नाही तर अॅट्राॅसिटी आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करू, अशी धमकी दिली. तसेच गाडेकर यांच्या घरी व उपाहारगृहावर जाऊन दोघांनी शिवीगाळ करत जिवे ठार मारण्याची धमकी दिली. 

बातम्या आणखी आहेत...