आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

9 वर्षांच्या मुलीवर रेप करणाऱ्या धर्मगुरूला वडिलांनी दिली अशी शिक्षा, ऐकूण प्रत्येकाचाच उडाला थरकाप!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - अवघ्या 9 वर्षांच्या बलात्कार पीडितेच्या वडिलांना कोर्टाने तुरुंगात डांबले आहे. आपल्या चिमुकल्या मुलीवर बलात्कार झाल्याचे कळताच त्याने रागाच्या भरात कथित आरोपीचे लिंग छाटण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान आरोपी इतका गंभीर जखमी झाला की त्याचा जीव गेला. मृत्यूमुखी पडलेला कथित आरोपी एका चर्चमध्ये पादरी होता. या घटनेनंतर कोर्टाने पीडितेच्या वडिलांना केवळ तुरुंगात डांबले नाही, तर त्याला जामीन सुद्धा नकारला आहे. 


असे आहे प्रकरण...
सध्या तुरुंगात असलेल्या बलात्कार पीडितेच्या वडिलांना पीडितेच्या आईने सप्टेंबरमध्ये मुलीवर अत्याचाराची हकीगत सांगितली होती. आपल्या शहरातील चर्चमध्ये पादरी असलेल्या 66 वर्षीय मेस मलगास याने चिमुकलीवर बलात्कार केला असे तिने पतीला सांगितले. यावरून पीडितेचा बाप इतका खवळला की त्याने आपल्या पत्नीसह आणखी एका मित्राला घेऊन कथित आरोपी पादरीचे घर गाठले. तिघांनी मिळून मलगासला बेदम मारहाण केली. याचवेळी पीडितेच्या वडिलांनी मलगासचे लिंग छाटण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो यात सपशेल अयशस्वी झाला नाही आणि ते अर्धवट कापल्या गेले. तशाच रक्तबंबाळ अवस्थेत मलगास पळून जाण्याचा आणि मदत मागण्याचा प्रयत्न करत होता. तिघांनी त्याला पुन्हा पकडले आणि स्थानिक पोलिस स्टेशनला नेले. मलगासला अटक होईल असे पालकांना वाटत होते. परंतु, याच ठिकाणी कहाणीत मोठा ट्विस्ट आला. 


पादरीचा मृत्यू, वडिलांना अटक
पोलिसांनी संशयित आरोपीची अवस्था पाहून त्याला वेळीच उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी उपचार केला तोपर्यंत पोलिसांनी पालकांना आपल्या ताब्यात ठेवले. याच दरम्यान पादरीचा मृत्यू झाला आणि पोलिसांनी वडिलांना अटक केली. 


पीडितेच्या वडिलांबद्दल सहानुभूती, पण...
कोर्टाने पीडितेच्या वडिलांना अटक आणि जामीन नकारण्यावर आपली भूमिका स्पष्ट केली. ईस्ट लंडनच्या न्यायाधीशांनी सांगितल्याप्रमाणे, पीडित मुलगी आणि तिच्या वडिलांच्या अवस्थेबद्दल कोर्टाला सहानुभूती आहे. मुलीवर बलात्कार झाला हे वैद्यकीय अहवालात स्पष्ट देखील झाले. परंतु, पादरीवर फक्त आरोप झाला त्याने बलात्कार केल्याचे सिद्ध झाले नाही. सिद्ध झाल्याच्या परिस्थितीत सुद्धा वडिलांना कायदा आपल्या हातात घेऊन त्याचा जीव घेण्याचा अधिकार नाही. त्यामुळेच, पादरीने बलात्कार झाल्याचे सिद्ध होत नाही तोपर्यंत जामीन मिळणार नाही असे न्यायालयाने सांगितले.

बातम्या आणखी आहेत...