आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुकानात जाणाऱ्या गतीमंद मुलीला वाटेतच अडवले, निर्जनस्थळी नेऊन केला सामूहिक बलात्कार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अल्पवयीन गतीमंद मुलीवर अत्याचार करणाऱ्या दोन्ही नराधमांना बेड्या

खामगाव - क्रुरतेची परिसिमा गाठणाऱ्या हैद्राबाद, उन्नाव व जिल्ह्यातील खेर्डा येथील घटनेची शाई वाळत नाही तोच पुन्हा एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. शहरालगत असलेल्या एका गावात अल्पवयीन गतीमंद मुलीवर मंगळवारी (10 डिसेंबर) रात्रीच्या सुमारास दोन वासनांध नराधमांनी बलात्कार केला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी दोन्ही नराधमांना अटक केली आहे.

खामगाव शहरानजीक असलेल्या एका गावातील 16 वर्षीय गतीमंद मुलगी 10 डिसेंबर मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजता काही वस्तू आणण्यासाठी दुकानात जात होती. त्यावेळी गावातीलच ज्ञानेश्वर तायडे याने तिला गाठले व तिच्याशी गोड-गोड बोलून तिला गावालगत असलेल्या निर्जनस्थळी घेवून गेला. या ठिकाणी एका झोपडीत ज्ञानेश्वर तायडे व त्याचा साथीदार दत्ता साठे याने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर आळी-पाळीने बलात्कार केला. बराचवेळ होवूनही मुलगी घरी न आल्याने कुटुंबीयांनी शोधा-शोध सुरु केली होती. इतक्यात पिडीत मुलगी रडत-रडत घरी आली.
घरी आल्यानंतर पीडितेने घडलेला सर्व प्रकार आईला सांगितला. त्यानंतर लगेच पीडीत मुलीला घेवून तिच्या आईने शिवाजी नगर पोलिस स्टेशन गाठले. पोलिसांनी लगेच शोध मोहिम राबवून ज्ञानेश्वर तायडे व दत्ता साठे यांना अटक केली. या प्रकरणी पिडीत मुलीच्या आईच्या तक्रारीवरुन पोलिसांनी युवकांविरुद्ध कलम 376 (डी), 376 (2) (आय) बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम-5 (ग), 5 (क) आणि कलम 6 नुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास शिवाजी नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे.बलात्काराच्या घटनेने समाजमन हादरले 


देशात, राज्यात व पर्यायाने जिल्ह्यातही बलात्काराच्या घटना वाढल्या आहेत. दिवसाआड बलात्काराच्या घटना घडत असल्याने महिलांच्या असुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. जळगाव जामोद तालुक्यातील खेरडा बु. येथील दिव्यांग महिलेवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेला काहीच दिवस गेले असतांना खामगाव शहरानजीकच्या घाटपुरी येथे अल्पवयीन गतिमंद मुलीवर अत्याचाराची घटना घडली आहे. मोठ्या प्रमाणावर अत्याचाराच्या घटना घडत असल्याने समाजमन हादरले आहे.