आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हवामान बदलामुळे समुद्राच्या पातळीत वेगाने वाढ, भारताला जास्त धोका : यूएन

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बँकॉक - संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी हवामान बदलाच्या धोक्यांवर भारताला सावध केले आहे. त्यांनी थायलंडची राजधानी बँकाॅकमध्ये सांगितले की, हवामान बदलामुळे समुद्राच्या पाणी पातळीत गतीने वाढ होत आहे. भारत, जपान, चीन, बांगलादेश यांना यापासून सर्वाधिक धोका आहे. याला तोंड देण्यासाठी या देशांचे प्रयत्न तोकडे आहेत. गुटेरेस यांनी क्लायमेट सेंट्रलचा अहवालाचा आधार घेत सांगितले की, २०५० पर्यंत समुद्राची वाढती पाणी पातळी अंदाजापेक्षा तिप्पट लोकसंख्या म्हणजे दिडसे कोटी लोकांना प्रभावित करेल. यामुळे मुंबई पुर्णपणे बुडण्याचा धोका आहे. हवामान बदल पृथ्वीसाठी सर्वात मोठा धोका आहे. जोपर्यंत लोक याविरोधात लढा देत नाहीत तोपर्यंत हा धोका राहिल. वाढत्या तापमानावर नियंत्रण आणावे लागेल. पुढील दशकात कार्बन उत्सर्जन ४५% पर्यंत कमी करणे आवश्यक आहे.

हवामान करार: अमेरिकेची बाहेर पडण्याची प्रक्रिया सुरू
वॉशिंग्टन |अमेरिकेने पॅरिस हवामान करारातून बाहेर पडण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पोंपियो यांनी सांगितले की, याची माहिती संयुक्त राष्ट्राला देण्यात आली आहे. अमेरिका माहिती दिल्यापासून एक वर्षांनंतर पॅरिस करारातून बाहेर पडेल. या करारावर भारतासह १८८ देशांनी स्वाक्षरी केली आहे. स्वाक्षरीची मोहिम २०१५ पासून सुरू झाली होती.

बातम्या आणखी आहेत...