आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाचे आमिष दाखवत तरुणीवर बलात्कार; कुणाला सांगितल्यास दिली खुनाची धमकी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - युवतीला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर बलात्कार करून लग्नासाठी खरेदी केलेले सोने आणि दोन लाख ३५ हजारांची रक्कम घेऊन ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी संशयित दीपक काळे याच्याविरोधात अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेली माहिती व पीडित युवतीने दिलेल्या तक्रारीनुसार, पीडिता नाशकातील सिडकोत राहते. संशयित दीपक शिवाजी काळे (रा. दौलतनगर) याचे पीडित युवतीसोबत लग्न ठरले होते. दोघांचा सुपारीचा कार्यक्रमही झाला होता. पीडितेच्या घरी संशयिताचे येणे जाणे होते. तेथे अंगलट करत, ‘आज ना उद्या आपले लग्न होणार आहे’, असे सांगत पीडितेच्या इच्छेविरोधात त्याने शारीरिक संबध ठेवले. संशयिताने वेगवेगळी कारणे सांगितल्याने 

पीडितेने दोन लाख ३५ हजार रुपये विश्वासाने दिले होते. तसेच, पैसे कमी पडत असल्याने सोन्याची साखळीदेखील संशयिताने घेतली. लग्नाबाबत विचारले असता संशयिताने, ‘लग्नाचा विषय काढला तर ठार मारून अपघातात मरण पावल्याचे सिद्ध करेन’, अशी धमकी दिल्याचे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. संशयिताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ निरीक्षक श्रीपाद परोपकारी तपास करत आहेत.