आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन बालिकांवरील बलात्काराच्या अाराेपींची पोलिस काेठडीत रवानगी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- हिंजवडी परिसरातील संत तुकाराम महाराज सहकारी साखर कारखाना परिसरात मंदिरात गेलेल्या दाेन १२ वर्षाच्या अल्पवयीन मुलींना चाॅकलेटचे आमिष दाखवून झुडपात नेऊन अत्याचार करणाऱ्या दोन आरोपींना पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे. ही घटना रविवारी घडली होती आणि दोनपैकी एका मुलीचा बुधवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. गणेश निकम (२२) आणि अन्य एका अल्पवयीनाने हा बलात्कार केला होता. 


पीडितांचे कुटुुंबीय हे ऊस कापणीच्या कामासाठी साखर कारखान्यात आले आहेत. आरोपीही कारखान्यातच कामाला होते. रविवारी दुपारी ३.३० वाजता या मजुरांच्या दाेन मुली शाळेला सुटी असल्याने घराजवळील मंदिरात गेल्या हाेत्या. तिथे गणेश निकम व त्याच्या अल्पवयीन साथीदाराने मुलींना चाॅकलेटचे आमिष दाखवून मंदिरामागील झुडपात नेले. दोघांनी सुरुवातीला एका मुलीवर बळजबरीने अाळीपाळीने बलात्कार केला. तर, एका मुलीवर एकाने बलात्कार केला. कुठेही वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकीही त्यांना दिली. त्यामुळे पीडित अल्पवयीन मुली लैंगिक अत्याचार हाेऊनही शांत राहिल्या. मात्र, बुधवारी एकीची प्रकृती ढासळली आणि रुग्णालयात तिचा मृत्यू झाला. तेव्हा हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. 

 

बातम्या आणखी आहेत...