आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोठ्या-मोठ्या डोळ्यांसह जन्मली चिमुरडी, सगळेच करत होते कौतुक, सत्य समजले तेव्हा सर्वांनाच बसला धक्का

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मिनेसोटा - अमेरिकेत राहणाऱ्या एका दोन वर्षीय चिमुरडीचे डोळे अत्यंत सुंदर आहेत. प्रत्येक जण तिचे कौतुक करत असतो. पण या सुंदर डोळ्यामागचे कारण अत्यंत वाईट आहे. या चिमुरडीला दुर्मिळ आजार आहे. त्यामुळेच तिच्या डोळ्यांचे बुबुळ अत्यंत मोठे आहेत. जन्मानंतर आठवडाभरातच या आजाराबाबत समजले. 2 लाखांमधून एखाद्याला हा आजार होतो. या आजारामुळे दृष्टी जाण्याची भीतीही असते. 


जन्मानंतर होत होते कौतुक 
- ही कथा आहे मिनेसोटामध्ये राहणार्या मेरोन आणि करीना मार्टिनेज यांची दोन वर्षांची मुलगी मेहलानी हिची. मेहलानी डोळ्यांचा दुर्मिळ आजार एक्सेनफेल्ड रीगर सिंड्रोमचा सामना करतेय. त्यामुले तिचे बुबुळ मोठे आहेत.
- मेहलानीची आई म्हणाली की, ती जन्मली तेव्हा माझे वय 18 वर्षे होते आणि मला काहीही आजार नव्हता. जन्माच्या वेळी मुलीचे डोळे मोठे होते. ती सुंदर दिसत होती आणि आम्हीही आनंदी होतो. 
- हॉस्पिटलमधून जिस्चार्ज करण्यापूर्वी मुलीची पूर्णपणे तपासणी करण्यात आली. त्यानंतर डॉक्टरने कपलला असे काही सांगितले की त्यांचा आनंदाचे रुपांतर निराशेत झाले. डॉक्टरने सांगितले की, मुलीला एक दुर्मिळ आजार आहे. 
- या आजारामुळे गर्भात मुलीच्या डोळ्याचे बुबुळ योग्य विकसित न झाल्याचे त्याला चिरा गेल्यासारखे दिसते. डॉक्टरांच्या मते या आजारामुळे मुलीला इतर काही अडचणीही आल्या त्यामुळे हृद्यरोग आणि ग्लुकोमा याचाही समावेश आहे. 


कुटुंबाने नावही ऐकले नव्हते 
- मुलीला जो आजार आहे, त्यामुळे तिचे बुबुळ मोठे तर आहेच पण ते संवेदनशीलही आहेत. त्यामुळे उन्हात तिला गॉगलशिवाय फिरता येत नाही. 
- वर्षभरापूर्वी तिच्या डोळ्यात ग्लुकोमा असल्याचेही समजले. त्यामुळे डोळ्यावरील दबाव वाढला आणि दृष्टी जाण्याचा धोकाही वाढला. 
- बुबुळांद्वारेच डोळ्यात प्रकाश जातो. त्यामुळे सरासरी आकारापेक्षा मोठे बुबुळ असल्याने मेहलानीला उन्हाचा त्रास होतो. 
- मेहलानीची आई म्हणाली की, आम्ही कधी या आजाराचे नावही ऐकले नव्हते. लोक जेव्हा तिच्या डोळ्याचे कौतुक करतात तेव्हा तिच्या आजाराबाबत सांगावे की नाही हेच कळत नाही. आम्ही फक्त थँक यू म्हणतो. 

(अनेक अशा रियल लाइफ स्टोरीज आहेत ज्या धक्कादायक आण अत्यंत अनोख्या आहेत. त्याबाबत आपल्या सर्वांना माहिती असायला हवी यासाठी या स्टोरीज येथे देत आहोत.)

बातम्या आणखी आहेत...