आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

47 वर्षे जुने नाइकीचे फ्लॅट मून बुटाला लिलावात लागली तीन कोटींची बोली, जुन्या बुटांना लागलेली आतापर्यंती सर्वात मोठी बोली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क- नाइकी कंपनीच्या सगळ्यात दुर्मिळ बुटांचा सेट मंगळवारी 3 कोटी रुपयांत लिलाव झाला. ही आतापर्यंत जुन्या बुटांना लावलेली सर्वात मोठी बोली आहे. याआधी मायकल जॉर्डनच्या बुटांना 1.3 कोटी रुपयांत विकण्यात आले होते. नाइकीने या बुटांना 47 वर्षांपूर्वी ऑलिम्पिक ट्रायलसाठी डिझाइन केले होते. या बुटांना मून शूज नाव देण्यात आले होते.


लिलाव सोदबी ऑक्शन हाउसमध्ये झाला
हा सार्वजनिक लिलाव न्यूयॉर्कच्या सोदबी ऑक्शन हाउसमध्ये झाला. या बुटांना 1972 मध्ये नाइकीचे को-फाउंडर आणि ट्रॅक कोच बिल बोवर्नमनने डिझइन केले होते.

 

सोदबीनुसार, या बुटांसाठी ही ऐतिहासिक बोली कॅनडाचे गुंतवणुकदार माइल्स नडालने लावली आहे. त्याशिवाय त्यांनी आणखी 99 बुट लिलावात खरेदी केले. नडालने एकूण 100 बुटांसाठी 5.86 कोटींची बोली लावली.


याआधी मायकल जॉर्डनच्या 35 वर्षे जुन्या बुटांसाठी 1.3 कोटी रुपयांची बोली लावण्यात आली होती. या बुटांचा सार्वजनिक लिलाव 2017मध्ये कॅलिफोर्नियात झाला होता. जॉर्डनने या बुटांना 1984 ऑलिम्पिकच्या बॉस्केटबॉल फायनलमध्ये घातले होते.

बातम्या आणखी आहेत...