आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - भारतरत्न माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे शुक्रवारी निधन झाले. एम्सने एक बुलेटिन जारी करून याची माहिती दिली. त्यानुसार, अटलजींनी संध्याकाळी 5 वाजून 5 मिनिटांनी शेवटचा श्वास घेतला. अटलजी मागच्या 9 आठवड्यांपासून हॉस्पिटलमध्ये दाखल होते. 24 तासांपासून व्हेंटिलेटरवर होते. 94 वर्षीय अटल बिहारी वाजपेयी 2009 पासून व्हीलचेअरवर होते.
अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्म 25 डिसेंबर 1924 रोजी मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरमध्ये एका ब्राह्मण कुटुंबात झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव कृष्ण बिहारी वाजपेयी आणि आईचे नाव कृष्णा देवी होते. असे म्हटले जाते की, अटल बिहारी वाजपेयींनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात कम्युनिस्ट म्हणून सुरू केली होती, परंतु नंतर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडले आणि हिंदुत्वाचा झेंडा बुलंद केला.
पुढच्या स्लाइडवर पाहा, अटल बिहारी वाजपेयी यांचे दुर्मिळ Photos...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.