आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीनएजपासून आतापर्यंत एवढा बदलला सलमानचा Look, तुम्ही पाहिलेत का हे Rare Photos

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानने वयाची 53 वर्षे पूर्ण केली आहेत. हा खास दिवस तो त्याच्या पनवेलस्थित फार्म हाऊसवर घालवतोय. येथे सलमानचे फॅमिली मेंबर्स आणि जवळचे फ्रेंड्स त्याच्यासोबत आहेत. वाढदिवसाच्या पुर्वसंध्येला या फार्म हाऊसवर सलमानसाठी बर्थडे पार्टी होस्ट करण्यात आली होती. गर्लफ्रेंड युलियासोबत मंगळवारी संध्याकाळी सहा वाजता तो फार्म हाऊसवर पोहोचला.

 

सलमानला बॉलिवूडमध्ये काम करुन 26 वर्षांहून अधिकचा काळ झाला आहे. त्याच्या प्रोफेशनल लाइफविषयी चाहत्यांना बरंच काही ठाऊक आहे. पण आज आम्ही तुम्हाला सलमानचे पडद्यामागील काही निवडक फोटोज दाखवत आहोत, जे कदाचित तुम्ही कधी पाहिले नसतील. 27 डिसेंबर 1965 रोजी इंदोर, मध्यप्रदेशमध्ये जन्मलेल्या सलमानचे खरे नाव अब्दुल राशिद सलीम सलमान खान असले आहे.

 

बहीण भावंडात मोठा आहे सलमान..
- पाच बहीणभावंडांमध्ये सलमान सर्वात मोठा आहे. अरबाज, सोहेल, अलविरा आणि अर्पिता ही त्याच्या धाकट्या बहीणभावंडांची नावे आहेत. सलमानचे वडील सलीम खान हे प्रसिद्ध लेखक तर आई सुशीला चरक (सलमा खान) या गृहिणी आहेत.


- सलमानची दुसरी आई हेलन या गतकाळातील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत.
- सलमानने 1988 मध्ये जे के बिहारींच्या 'बीवी हो तो ऐसी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली होती. पण त्याचा लीड रोल असलेला पहिला चित्रपट आहे 1989 मध्ये आलेला 'मैंने प्यार किया'. सूरज बडजात्या यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता.
- सलमानने आतापर्यंत 76 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. नुकताच त्याचा टायगर जिंदा है हा चित्रपट रिलीज झाला आहे. रिलीजच्या अवघ्या तीन दिवसांत चित्रपटाने 100 कोटींहून अधिकची विक्रमी कमाई केली आहे.

 

पुढील स्लाईड्सवर बघा, सलमानचे रेअर फोटोज...

बातम्या आणखी आहेत...