आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अबब! 1 किलो चहाची किंमत तब्बल 1 लाख 36 हजार रुपये, पौर्णिमेच्या दिवशीच तोडली जातात या चहाची पाने

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दार्जिलिंग - दार्जिलिंगपासून 33किलोमीटर दक्षिणेकडे उगणाऱ्या या चहाला सिल्व्हर टिप्स इम्पीरिअल या नावाने ओळखतात. या चहाची कळी काही खास लोकच तोडतात ज्यांचा संबध मुकाईबाडी चहाच्या बागांसोबत आहे.  सिल्व्हर टिप्स इम्पीरिअल चहाला पौर्णिमेच्या रात्रीच तोडले जाते. अनेक रहस्यांमध्ये अडकलेला हा चहा दुसऱ्या जगातील गोष्ट असावी असे मानतात. गमतीची गोष्ट म्हणजे या चहाची खूप जास्त रहस्य असल्यामुळे  त्याची किंमतही तेवढीच आहे.


2014 मध्ये सिल्व्हर टिप्स इम्पीरिअल चहा 1 लाख 36 हजार रुपये किलोंपेक्षा  अधिक किंमतीने विकला गेला होता. भारतात उगणऱ्या या चहाला आतापर्यंत सर्वात जास्त किंमत म्हणून  रेकॉर्ड प्राप्त झालेले आहे. पौर्णिमेच्या रात्री  हातात मशाल घेऊन मुकाईबाडीचे बागान कामगार याच्या कळ्यांना निवडतात. स्थानिक लोकांच्या सांगन्यानुसार या चहामध्ये पृथ्वीवरील सगळी जादू, ब्रम्हांडामधील सगळी गुपिते आणि मातीतील  सगळी शक्ती समाविष्ट आहे. 


चांदण्या रात्रीचे गुपित 
सिल्व्हर टिप्स इम्पीरिअलची अनोखी चहाची पाने पहाटेच्या वेळीच पॅक केली जातात. असे मानले जाते कि, सुर्याच्या किरणांमुळे याची शक्ती आणि सुगंधावर फरक पडतो. दरवर्षी अनोख्या प्रकारच्या चहाचे पिक केवळ 50 ते 100 किलोंच्या दरम्यानच  येते. जपान, ब्रिटन आणि अमेरिका या देशांमध्ये या चहाला जास्त मागणी आहे.

 

असा चहा अख्या जगात कुठेच नाही

सिल्व्हर टिप्स इम्पीरिअल या चहाचा सुगंध जेवढा छान आहे त्यासारखाच याचा अंदाजदेखील अनोखा आहे. हा चहा अँटी-एजिंग असल्यामुळे पिणाऱ्याला प्रसन्न करून टाकतो. या चहाला पृथ्वीवरील अमृत म्हणून देखील ओळखतात. 

बातम्या आणखी आहेत...