आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मकर राशीच्या लोकांच्या 15 खास गोष्टी, कसा राहतो यांचा स्वभाव

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्योतिष शास्त्रामधील राशीचक्रातील दहावी राशी आहे मकर. या राशीचा स्वामी शनी आहे. मकर राशीच्या लोकांच्या नावाचे पहिले अक्षर भो, जा, जी, खी, खू, खा, खो, गा किंवा गी पासून सुरु होते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार जाणून घ्या, मकर राशीच्या लोकांच्या 15 खास गोष्टी.


1. मकर राशीचे चिन्ह मगर आहे. या राशीच्या व्यक्ती अति महत्त्वाकांक्षी असतात.
2. सन्मान आणि यश मिळवण्यासाठी कितीही कष्ट उपसण्याची या व्यक्तींची तयारी असते.
3. या व्यक्तींचा स्वभाव शाही असतो. व्यक्तिमत्त्वही गंभीर असते. आपले ध्येय साध्य करण्यासाठी या व्यक्तींना कठोर परिश्रम करावे लागतात.
4. प्रवास करणे या व्यक्तींना आवडते. गंभीर स्वभावामुळे ही मंडळी कुणालाही सहज मित्र करत नाहीत. विशेष म्हणजे यांचे बहुतांश मित्र कार्यालये व व्यवसायातील असतात.
5. भुरकट आणि निळा रंग या व्यक्तींना आवडतो.


6. मितभाषी, गंभीर आणि उच्च पदांवरील व्यक्ती यांना आवडतात.
7. देव व नशिबावर या व्यक्तींचा विश्वास असतो. पसंती आणि नापसंती याबद्दल दृढ असल्याने याचे वैवाहिक जीवन लवचिक नसते. त्यामुळे यांच्या जीवनसाथींना अनेक गोष्टी त्रासदायक वाटू शकतात.
9. या राशीचे लोक मित्रांच्या सहकार्याने जीवनात प्रगती करतात.


10. या राशीच्या मुली सडपातळ असतात. यांना व्यायाम करणे आवडते. उंची जास्त असूनही यांना हाय हिल सँडल घालायला आवडते.
11. पारंपारिक प्रथांवर विश्वास ठेवणाऱ्या असतात. छोट्या-छोट्या वाक्यामध्ये विचार मांडतात.
12. इतरांचे विचार सहजपणे समजून घेतात आणि यांचा मित्रपरिवार मोठा असतो.


13. या राशीच्या मुलीना पिळदार शरीराचे पुरुष जास्त आकर्षित करतात.
14. करिअर क्षेत्रामध्ये यश प्राप्त करण्यासाठी खूप कष्ट करण्यास तयार असतात.
15. कुटुंबाच्या सुखासाठी कोणतीही जोखीम स्वीकारण्यास सज्ज राहतात.

बातम्या आणखी आहेत...