आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृश्चिक राशीच्या लोकांच्या 15 खास गोष्टी, जाणून घ्या कसा राहतो यांचा स्वभाव 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्या लोकांच्या नावाचे पहिले अक्षर तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यू पासून सुरु होत असेल त्यांची राशी वृश्चिक असते. ही राशीचक्रातील आठवी राशी आहे. या राशीचे चिन्ह विंचू असून ही जलतत्त्वाची राशी आहे. या राशीचा स्वामी मंगळ आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार जाणून घ्या, वृश्चिक राशीच्या लोकांच्या खास गोष्टी...


1. वृश्चिक राशीच्या व्यक्तींमध्ये इतरांना आकर्षित करण्याची क्षमता असते. या राशीच्या व्यक्ती बहाद्दूर तसेच भावुकही असतात.
2. या राशीच्या व्यक्तींना मूर्ख बनवणे सहजसोपे नसते.
3. या राशीच्या व्यक्तींना धोका देणे शक्य होत नाही. या व्यक्ती नेहमीच योग्य सल्ला देण्यात विश्वास ठेवतात.
4. या राशीच्या व्यक्ती स्वत:चे विचार फारसे बोलून न दाखवणाऱ्या तसेच इतरांच्या विचारांना विरोध करणाऱ्या असतात.
5. या व्यक्ती सर्वांमध्ये मिसळू शकत नाहीत.


6. या राशीच्या महिला बुद्धिमान आणि भावुक असतात. यांची इच्छाशक्ती प्रबळ असते तसेच स्वभावाने हट्टी व अतिमहत्त्वाकांक्षी असतात. थोडीफार स्वार्थी प्रवृत्तीही असते.
7. स्वतंत्रपणे निर्णय घेणे यांची सवय असते. नोकरीमध्ये नेहमी स्वत:चे वर्चस्व कायम ठेवतात.
8. लोकांच्या चुका आणि वाईट गोष्टी लक्षात ठेवतात आणि योग्य वेळ आल्यावर उत्तरही देतात. यांची वाणी कटू आणि क्रोध जास्त असतो परंतु मन साफ असते. इतरांमध्ये दोष शोधण्याची सवय असते.


9. या राशीच्या मुली तीक्ष्ण दृष्टी असलेल्या असतात. या जास्त सुंदर नसल्या तरी आकर्षक असतात.
10. हे लोक बुद्धिमान आणि भावूक असतात. यांच्या इच्छाशक्ती दृढ असते. स्त्रिया हट्टी आणि महत्त्वकांक्षी असतात.
11. स्वतंत्र निर्णय घेणे यांच्या स्वभावातच असते. माहेरची जास्त ओढ राहते. नोकरी करणाऱ्या असतील तर स्वतःचे वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतात.


12. या लोकांची काम करण्याची क्षमता जास्त असते. भौतिक सुखांचे जास्त आकर्षण राहते.
13. हे व्यक्ती कामाबद्दल सजग आणि हाती घेतलेले काम पूर्ण करूनच शांत बसतात.
14. स्मरणशक्ती तीव्र असते आणि खेळामध्ये या राशीच्या मुलांना जास्त रुची असते.

बातम्या आणखी आहेत...