आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2019 मध्ये धनवान होण्यासाठी राशीनुसार करा हे काम, नेहमी राहाल सुखी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुम्हाला खूप कष्ट करून देखील योग्य मोबदला मिळत नसेल आणि आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत असेल तर येथे खास उपाय सांगण्यात येत आहेत. हे उपाय राशीनुसार असून खूप सोपे आणि अचूक आहे. 2019 मध्ये तुम्ही हे उपाय नियमितपणे करून कायमस्वरूपी सुखी राहू शकता.


मेष -
घराच्या दक्षिण दिशेला गुळाचा खडा ठेवून प्रस्थान करा. कामामध्ये यश मिळेल. एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडण्यापूर्वी हा उपाय अवश्य करावा.


वृषभ -
एखाद्या पांढर्‍या रंगाच्या गाईला कच्चे तांदूळ खाऊ घातल्यास लाभ होईल. शुक्रवारपासून दररोज हा उपाय सुरु करावा. या उपायामुळे तुम्हाला धनलाभ करून देणारे योग जुळून येतील.


मिथुन -
बुधवारी अखंड मुगाचे दान करावे. एखाद्या विवाहित स्त्रीला सौभाग्याचे सामान दान करावे. गाईला नियमित हिरवा चारा टाकावा. घरातील वायव्य दिशेला (पश्चिम-उत्तर) पैसा ठेवणे तुमच्यासाठी शुभ राहील.


कर्क -
घराच्या पश्चिम दिशेला कबुतरांसाठी ज्वारीचे दाणे टाकल्यास लाभ होईल. घरातील नकारात्मक उर्जा नष्ट होईल आणि घरात सुख-शांती कायम राहील.


सिंह -
तांब्याच्या कलशामध्ये पाणी घेऊन घराच्या पूर्व दिशेला शिंपडावे. या उपायाने शुभ वार्ता समजेल. घरातील वृद्ध व्यक्तीचे आरोग्य चांगले राहील. या उपायाने घरातील नकरात्मक उर्जा नष्ट होईल.


कन्या -
घराच्या उत्तर दिशेला नियमित हिरवा चार गाईसाठी ठेवावा. शक्य असल्यास गरीब किंवा गरजू व्यक्तीला मुग आणि गुळाचे दान करावे. या उपायाने घरातील उत्तर दिशेला लक्ष्मीचा वास राहील आणि पैशाचा अपव्यय टळेल. अडकलेला पैसा परत मिळेल.


तूळ -
शुक्रवारी सकाळी घराच्या उत्तर-पश्चिम दिशेला पांढर्या कपड्यात तांदूळ बांधून ठेवा. हा उपाय केल्याने मंगलकार्य जुळून येतील आणि वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतील. कामामध्ये यश मिळेल.


वृश्चिक -
घराच्या दक्षिण-पूर्व दिशेला लाल कपड्यात जवस बांधून ठेवा. हा उपाय केल्यास वाईट शक्तींचा घरात प्रवेश होणार नाही. मुलांवर शुभ प्रभाव राहील.


इतर राशींचे उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

बातम्या आणखी आहेत...