आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Rashid Khan Flaunted A New Bat Design At The Ongoing Edition Of The Big Bash League 2020

अफगानिस्तानचा फिरकीपटू राशीदने 'कॅमल बॅट' चा शोध लावला, आयपीएलमध्ये आणण्याची हैदराबाद संघाने केली मागणी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राशीद खान ऑस्ट्रेलियातील टी -20 स्पर्धा बिग बॅशमध्ये अ‍ॅडिलेड स्ट्रायकरकडून खेळत आहे
  • राशीदने मेलबर्न रेनेगेड्सविरुध्द कॅमल बॅटच्या सहाय्याने 16 चेंडूत 25 धावा फटकावल्या

स्पोर्ट डेस्क - अफगानिस्तानचा स्टार फिरकीपटू राशीद खानने ऑस्ट्रेलियातील बिग बॅश टी-20 स्पर्थेत 'कॅमल बॅट'ची निर्मिती केली. राशिद या स्पर्थेत एडिलेड स्ट्राइकर संघाकडून खेळत आहे. राशिदने रविवारी मेलबर्न रेनेगेड्स विरोधात खेळताना या बॅटने 16 चेंडूवर 25 धाव्या केल्या. बॅटचा मागील भाग उंटाच्या पाठीसारखा वर झालेला आहे. क्रिकेट डॉट कॉम डब्ल्यू एयूने या बॅटसोबत राशीदचा फोटो शेअर केला होता. सर्व याला कॅमल बॅट म्हणू शकता असे कॅप्शन देखील दिले होते.  

राशीद खान आयपीएलमध्ये सनराइजर्स हैदराबादकडून खेळतो. फ्रँचायझीने क्रिकेट डॉट कॉम डॉट एयूच्या ट्विटवर रीट्वीट करत ही बॅट आयपीएल 2020 मध्ये सोबत घेऊन येण्यास सांगितले. 

राशीदने 15 धावा देत दोन गडी बाद केले


राशीदने आपल्या डाव्यात दोन षटकार आणि दोन चौकार लगावले. गोलंदाजी करताना त्यांने चार षटकांत 15 धावा देत दोन गडी बाद केले. राशिदच्या अष्टपैलू खेळीमुळे एडिलेडने मेलबर्नचा 18 धावांनी पराभव केला. बातम्या आणखी आहेत...