आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीला खिंडार; जयदत्त क्षीरसागरांनी हाती बांधले शिवबंधन, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत केला शिवसेनेत प्रवेश

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ काढून शिवसेनेचे शिवबंधन हाती बांधले. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते त्यांनी भगवा झेंडा हाती घेतला. जयदत्त क्षीरसागर यांच्या शिवसेनेत प्रवेशामुळे राष्ट्रवादीला बीडमध्ये मोठे खिंडार पडले आहे. 


जयदत्त क्षीरसागर हे बीड जिल्ह्यात राष्ट्रवादीचे एकमेव आमदार होते. त्यांच्या राजकीय प्रवासात ते आजपर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत निष्ठांवंत राहिले, परंतु बीड नगर पालिका निवडणुकीपासून त्यांचे घर फुटले. क्षीरसागर कुटुंबात जयदत्त क्षीरसागर एक गट तयार झाला तर पुतणे संदीप क्षीरसागर यांचा दुसरा गट तयार झाला. यामुळे जयदत्त क्षीरसागरांची डोकेदुखी वाढली होती. दरम्यानच्या काळात राष्ट्रवादी पक्षाकडून पुतणे संदीप क्षीरसागर यांना ताकत दिली जात होती, तर जयदत्त क्षीरसागर यांचे खच्चीकरण होत असल्याचे दिसले. त्यासोबत आगामी विधानसभेत जयदत्त क्षीरसागर यांना डावलून पुतणे संदिप क्षीरसागर यांना तिकीट दिले जाईल अशी भीतीही त्यांना होती. 


राष्ट्रवादीच्या हल्लाबोल सभा बीड जिल्ह्यात 6 ठिकाणी झाल्या पण पक्षाचे एकमेव आमदार असलेले क्षीरसागर एकाही सभेला उपस्थित नव्हते, एवढचे काय तर त्यांचा सभेच्या बॅनरवर देखील फोटो नव्हता. यामुळे क्षीरसागर बंधूंनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत, विकासकामांच्या माध्यमातून चांगलीच जवळीक साधली. मुख्यमंत्री फडणवीसांसोबत हेलिकॉप्टर मधून बीडमध्ये केलेली एन्ट्री चांगलीच चर्चेचा विषय बनली होती. तर वर्षावर केलेल्या गणपती आरतीने त्यात भर टाकली. काही दिवसांपूर्वी क्षीरसागर बंधूंनी फडणवीसांच्या उपस्थितीत बीडमध्ये विविध विकास कामांचा शुभारंभ देखील केला होता. या सगळ्यानंतर ते भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा होती, पण त्यांनि शिवसेनेत प्रवेश केला.

बातम्या आणखी आहेत...