Home | Maharashtra | Western Maharashtra | Ahmednagar | rashtrwadi party's sunil tatkare won from raigad and BJP's sujay vikhe won from ahmadnagar

Loksabha 2019 : रायगडमध्ये राष्ट्रवादीचे सुनील तटकरे विजयी तर नगरमध्ये सुजय विखेंनी मारली बाजी

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 23, 2019, 06:22 PM IST

अहमदनगर मतदारसंघात 19 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते

  • rashtrwadi party's sunil tatkare won from raigad and BJP's sujay vikhe won from ahmadnagar

    रायगड,अहमदनगर- एक-एक करत लोकसभेच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. रायगडमध्ये सुनील तटकरे शिवसेनेच्या अनंत गितेंनी पराभवाची धुळ चाखली आहे. तटकरेंनी तब्बल 21 हजार 700 मतांनी विजय मिळवून 2014 च्या पराभवाचा वचपा काढला, तर दुसरकडे काँग्रेमधून भाजपात आलेले सुजय विखे यांनी राष्ट्रवादीच्या संग्राम जगताप यांचा पराभव केला आहे.


    महाराष्ट्राच्या रायगड लोकसभा मतदारसंघात एकूण 16 उमेदवार रिंगणात होते. शिवसेनेने आपले विद्यमान खासदार अनंत गितेंना पुन्हा एकदा मैदानात उतरवले होते, तर राष्ट्रवादीकडून सुनील तटकरेंना परत एकदा संधी देण्यात आली होती. तर वंचित आघाडीकडून सुमन भास्कर कोळी आणि बसपातर्फे मिलिंद साळवींनी निवडणूक लढवली होती.


    तर अहमदनगर मतदारसंघात 19 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. यात 11 अपक्ष उमेदवार निवडणूक लढत होते. भाजपच्या तिकिटावर राज्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील लढत आहेत. भाजपने यावेळी विद्यमान खासदार दिलीप गांधींना तिकीट नाकारून काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या सुजय विखेंवर विश्वास दाखवला, तर राष्ट्रवादीने संग्राम जगताप यांना उमेदवारी दिली आहे. वंचित बहुजन आघाडीतर्फे सुधाकर लक्ष्मण, तर संजय सावंत बहुजन मुक्ती पार्टीचे उमेदवार आहेत. याशिवाय 11 अपक्षही आपले नशीब आजमावत आहेत.

Trending