आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोजागरी पौर्णिमेला रात्री वृंदावनात निधीवनामध्ये श्रीकृष्णाने गोपिकांसोबत केली होती रासक्रीडा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रविवार, 13 ऑक्टोबरला अश्विन मासातील पौर्णिमा आहे. यालाच कोजागरी किंवा शरद पौर्णिमा म्हणतात. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार द्वापार युगात भगवान श्रीकृष्णाने शरद पौर्णिमेच्या रात्री गोपिकांसोबाबत रासक्रीडा केली होती. मान्यतेनुसार आजही शरद पौर्णमालेच्या रात्री श्रीकृष्ण सर्व गोपिकांसोबत वृंदावनामध्ये निधीवनात रासक्रीडा रचतात. हे क्षेत्र श्रीकृष्णाचे प्रमुख तीर्थस्थान आहे.

  • गोपिका श्रीकृष्णाला पती रूपात प्राप्त करू इच्छित होत्या

द्वापार युगात वृंदावनातील सर्व गोपिका श्रीकृष्णाला पती रूपात प्राप्त करू इच्छित होत्या. गोपिकांनी आपली ही इच्छा श्रीकृष्णाला सांगितल्यानंतर श्रीहरींनी त्यांची ही इच्छा पूर्ण करण्याचे वचन दिले. कोजागरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र आपल्या पूर्ण 16 कलांमध्ये दिसतो. यामुळे श्रीकृष्णाने सर्व गोपिकांना यमुना नदीजवळील निधीवनात कोजागरी पौर्णिमेच्या रात्री भेटण्यास सांगितले. मान्यतेनुसार शरद पौर्णिमेला सर्व गोपिका रात्री निधीवनात पोहोचल्या. त्यावेळी निधीवनात जेवढ्या गोपिका होत्या, श्रीकृष्णाने तेवढे रूप धारण करून सर्व गोपिकांसोबत रासक्रीडा रचली.

  • निधीवनात तुळशीचे झाडे

निधीवनमधील झाडेसुद्धा एक रहस्य आहेत, इतर झाडांच्या फांद्या वरच्या दिशेने वाढत जातात, परंतु निधीवनमधील झाडांच्या फांद्या जमिनीकडे वाढतात. निधीवनमधील आणखी एक रहस्य म्हणजे येथील तुळशीची झाडे. निधीवनमधील तुळशीचे प्रत्येक झाड जोडीमध्ये आहे. यामागे अशी मान्यता आहे की, राधा-कृष्ण वनात रासक्रीडा करताना तुळशीची हीच जोडीदार झाडे गोपिका बनतात. सकाळ होताच सर्व गोपिका परत तुळशीच्या झाडामध्ये परिवर्तित होतात.

  • निधीवनातील रंगमहाल

निधीवनामध्येच रंगमहाल नावाचे एक मंदिर आहे. स्थानिक मान्यतेनुसार दररोज रात्री श्रीकृष्ण देवी राधासोबत येथे आराम करतात. यामुळे रंग महालात देवी राधा आणि भगवान श्रीकृष्णासाठी संध्याकाळ होण्यापूर्वी चंदनाचा पलंग, पाण्याचा कलश, देवी राधासाठी शृंगार साहित्य, प्रसाद, पान ठेवले जाते. संपूर्ण मंदिर सजवल्यानंतर रात्री निधीवनासोबतच मंदिराचे दरवाजे बंद केले जातात. सकाळी पाच वाजता मंदिराचे दरवाजे उघडल्यानंतर सर्व सामान पसरलेले, पान खाल्लेले, पाण्याचा कलश रिकामा आढळतो.

बातम्या आणखी आहेत...