Home | Maharashtra | Pune | rastrwadi candidate supriya sule won from baramati but parth pawar loose from mawal

LokSabha 2019 : बारामतीतून सुप्रिया सुळेंचा विजय, तर मावळमधून पार्थ पवार पराभूत

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 23, 2019, 06:21 PM IST

राज्यातील 48 लोकसभेच्या जागांसाठी 23 मे 2019 रोजी फेरी पद्धतीने निकाल जाहीर झाले

  • rastrwadi candidate supriya sule won from baramati  but parth pawar loose from mawal

    बारामती- संपूर्ण राज्याला उत्सुकता असलेल्या बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळेंनी पुन्हा एकदा विजय मिळवला आहे. सुप्रिया सुळेंनी यावेळी पूर्वीपेक्षा जास्त मतांनी विजय मिळवला आहे. त्यांनी 1 लाख 54 हजार मतांनी भाजपच्या कांचन कुल यांचाया पराभाव केलाय. तर दुसरीकडे राज्याचे लक्ष लागून असलेल्या मावळ मतदारसंघात शरद पवारांचे नातू आणि अजित पवारांचे सूपुत्र पार्थ पवारांचा शिवसेनेच्या श्रीरंग बारणेंनी पराभव केला आहे. 1 लाखांपेक्षा जास्त मत्ताधिक्याने पार्थ यांचा पराभाव झाला.


    राज्यातील 48 लोकसभेच्या जागांसाठी 23 मे 2019 रोजी फेरी पद्धतीने निकाल जाहीर झाले. निवडणूक अधिकारांच्या नागराणीत ही मतमोजणी पार पडली. निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार राज्यात मतमोजणीची संपूर्ण तयारी करण्यात आली होती. मतमोजणीसाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. राज्यात मतदानासाठी प्रथमच व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात आला आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील 5 व्हीव्हीपॅट यंत्रांमधील पावत्यांची पडताळणी करण्यात येणार आहे. या अनुषंगानेही मतमोजणी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे चित्र स्पष्ट झाले आहे. असा लागला बारामतीचा निकाल लागला आहे.

    काय म्हणाले श्रीरंग बारणे ?

    हा पार्थ पवार यांचा पराभव नसून अजित पवारांचा पराभव आहे. जनतेने लादलेला उमेदवार नाकारल आहे.

Trending