आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यामुळे नाही होऊ शकत रतन टाटा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, 81 व्या वाढदिवसानिमित्त जाणून घ्या त्यांच्याविषयी काही खास गोष्टी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


नवी दिल्ली : 28 डिसेंबर रोजी टाटा उद्योगसमुहाचे रतन टाटा यांनी वयाची 81 वर्ष पूर्ण केले आहेत. जगातील टॉप श्रीमंतांच्या यादीत रतन टाटा यांचा समावेश आहे. त्यांनी आपली अर्ध्याहून जास्त कमाई दान केली नसती तर ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती झाले असते. रतन टाटा जगातील प्रसिद्ध व्यवसायिक आहेत. त्यांनी अथक परिश्रमाने आणि जिद्दीने हा प्रवास पार केला आहे. त्यांना त्यांच्या उदारतेमुळे देखील ओळखले जाते. रतन टाटा यांचा स्वभाव लाजाळू असून त्यांना खोटा देखावा करण्यावर त्यांचा विश्वास नाही. 1991 ते 2012 पर्यंत त्यांनी टाटा समुहाचे चेअरमनपद भूषविले आहे. टाटा अनेक वर्षांपासून आपले पुस्तके आणि पाळीव कुत्र्यासोबत मुंबईतील कुलाबा येथील एका बॅचलर फ्लॅटमध्ये राहत आहेत. 

 
रतन टाटाकडे आहेत इतके शेअर्स
रतन टाटा हे टाटा समुहाचे मालक नसून इतरांप्रमाणे तेथील कर्मचारी आहेत. मीडिया रिपोर्टच्या मते. रतन टाट यांच्याकडे कंपनीचे 3,368 शेअर्स आहेत. त्यांच्याप्रमाणेच शापोरजी मिस्त्रीकडे 108 शेअर्स, सायरस मिस्त्रीची यांची 37,120 शेअर्सची गुंतवणूक आणि सर दोराबजी टाटा ट्रस्टकडे 1,13,067 शेअर्स आहेत.  
 

यामुळे श्रीमंतांच्या यादीत नाही समावेश  

एकदा एका रिपोर्टने त्यांना हाच प्रश्न विचारला होता. त्यावेळी रतन टाटा यांनी उत्तर दिले की, मी व्यापारी नसून उद्योगपती आहे. टाटा संसला टाटा ट्रस्टद्वारे चालवल्या जाते. यामध्ये एका व्यक्तीची भागीदारी नसते. टाटाच्या कमाईच्या 66 टक्के हिस्सा याच ट्रस्टला देण्यात येतो. अंबानी यांचा त्यांच्या व्यवसायावर स्वतःचा मालकी हक्क आहे. भविष्यात त्यांचा व्यवसाय मुलगा किंवा मुली सांभाळेल. पण रतन टाटा यांच्या निवृत्तीनंतर टाटा सन्सला नवीन चेअरमनची निवड करावी लागते. एकट्या व्यक्तीची कंपनी नसल्यामुळे रतन टाटा जगातील सर्वांत श्रीमंत नाही होऊ शकले. 
 

सामान्य परिवारातून आहेत रतन टाटा

रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी भारतातील सुरत येथे एका पारसी धर्मात झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव नवल तर आईचे नाव सोनू आहे. रतन टाटा 10 वर्षाचे असताना त्यांचे आई-वडील वेगळे झाले होते. तेव्हा जमशेदजी टाटा यांचा मुलगा रतनजी टाटा यांनी त्यांनी दत्तक घेतले आणि त्यांचे संगोपन केले. 

 

त्यांनी सुरुवातीचे शालेय शिक्षण मुंबई येथील Cathedral and John Connon School आणि Bishop Cotton School (शिमला) येथून पूर्ण केले. त्यानंतर 1962 मध्ये वास्तुशास्त्रात  B.S करण्यासाठी Cornell University येथे गेले. 1975 मध्ये Harvard Business School येथून Advanced Management Program चा अभ्यासक्रम पूर्ण केला. 

बातम्या आणखी आहेत...