आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Ratan Tata Was Impressed By Shantanu, Who Created A Special Belt To Save Street Dogs

अवघ्या 27 वर्षांचा शंतनू करताेे देशातील उगवत्या स्टार्टअपची निवड, त्याच्या सल्ल्यानुसार रतन टाटा घेतात गुंतवणुकीचा निर्णय

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - रतन टाटा. दिग्गज बिझनेस लीडर, गुंतवणूकदार व टाटा समूहाचे माजी अध्यक्ष. टाटांचे आेला, पेटीएम, स्नॅपडीलसारख्या ३० पेक्षा जास्त स्टार्टअपमधील वैयक्तिक गुंतवणुकीचे पूर्ण काम सांभाळतात २७ वर्षांचे शंतनू नायडू. त्यांचे काम रतन टाटा यांना स्टार्टअपमधील गुंतवणुकीसाठी मदत करणे. ते एक्झिक्युटिव्ह असिस्टंट (कार्यकारी सहायक) देखील आहेत. कमी वयात टाटांबराेबर काम करण्याचा त्यांचा प्रवास फार रंजक आहे. टाटा उगवत्या स्टार्टअपमध्ये गुंतवणुकीचे काम करतात त्याची माहिती शंतनूच्या शब्दांत... शंतनूच्या आधी कुटुंबातील चार पिढ्यांनी कंपनीत काम केले, पण टाटांना भेटू शकले नाही; वडिलांच्या सांगण्यावरून पत्र लिहिले मी पुण्यातल्या टाटा एलेक्सीमध्ये आॅटाेमाेबाइल डिझाइन इंजिनिअर म्हणून काम करत हाेताे. काम संपल्यानंतर रात्री विमाननगर महामार्गावरून घरी जाताना रस्त्यावरून वेगाने जाणाऱ्या वाहनांखाली अनेक कुत्र्यांना मरताना बघायचाे. या घटना मला त्रस्त करायच्या. नंंतर मग त्यांचा जीव वाचवण्यासाठीचा उपाय शाेधण्यासाठी लाेकांबराेबर चर्चा केली. मला कळले की चालकाला कुत्रा न दिसणे ही या दुर्घटनांची मुख्य कारणे हाेती. मी एक आॅटाेमाेबाइल इंजिनिअर असल्याने कुत्र्यांसाठी एक काॅलर बनवण्याची कल्पना मला सुचली. त्यामुळे चालकाला रात्री रस्त्यावर दिवे नसले तरी त्यांना दूरवरून दिसू शकते. काॅलरची निर्मिती सर्वाेत्तम प्रतीच्या रेस्ट्राे रिफ्लेक्टिव्ह मटेरियल म्हणजे चमकत्या साहित्यापासून केली हाेती. मित्रांच्या मदतीने हे शक्य हाेऊ शकले. माेटाेपाॅझ नावाच्या या लहान प्रयत्नाने अनेक लाेकांचे लक्ष आकर्षित केले. आता रस्त्यांवरच्या कुत्र्यांचा जीव वाचत हाेता.  या लहान पण महत्त्वाच्या कामाबाबत टाटा समूहाच्या कंपन्यांना पत्राने लिहून कळवले. त्यानंतर रतन टाटा यांचे लक्ष त्याकडे गेले. त्यांना स्वत:ला कुत्र्यांची खूप आवड आहे. वडिलांच्या सांगण्यानुसार टाटांनाही पत्र लिहिले. एकदा मुंबईत रतन टाटांनी त्यांच्या कार्यालयात भेटीचे आमंत्रण दिले. आमच्या कुटुंबातील माझी पाचवी पिढी आहे, जी टाटा समूहामध्ये काम करत आहे. यामध्ये बहुतांश अभियंता व तंत्रज्ञ म्हणून काम करतात. आम्ही एक्झिक्युटिव्ह नव्हताे. त्यामुळे याअगाेदर कधी त्यांची भेट हाेऊ शकली नव्हती. त्यांनी रस्त्यांवरील कुत्र्यांच्या प्रकल्पासाठी काय मदत हवी, अशी विचारणा केली. मी म्हटले, आम्हाला काेणतीही मदत नकाे. आम्ही विद्यार्थी हाेताे. पण त्यांनी प्राेत्साहन दिले व आमच्या प्रयत्नात गुंतवणूक केली. टाटांनी गुंतवणूक केल्यावर माेटाेपाॅझचा देशातल्या विविध ११ शहरांमध्ये विस्तार झाला आहे. अलीकडेच आम्हाला नेपाळ आणि मलेशियामधून काॅलरची आॅर्डर मिळाली आहे. त्या निमित्ताने टाटांची सतत भेट व्हायची.  एकदा त्यांनी मला काॅर्नेल विद्यापीठात एमबीए करण्यास सांगितले. मला तेथे प्रवेशही मिळाला. वर्ष २०१८ ची गाेष्ट. त्यांनी मला त्यांच्या कार्यालयात रुजू हाेण्यास सांगितले. अशा प्रकारची संधी आयुष्यात एकदाच मिळते. त्यांच्याबराेबर राहताना प्रत्येक मिनिटाला काही ना काही नवीन शिकायला मिळते. . त्यांच्याबराेबर राहणे आणि ते आपले निर्णय कसे घेतात हे टिपणे हीच एक खूप माेठी शिकवण आहे. तुम्ही त्यांच्याबराेबर काम करत आहात याची जाणीवही ते तुम्हाला करून देत नाहीत ही विशेष गाेष्ट आहे.

टाटांच्या अनुभवाचा फायदा स्टार्टअप्सला मिळताे
८१ वर्षांच्या रतन टाटांचा देशातल्या स्टार्टअप इकाेसिस्टिमवर खूप विश्वास आहे. जून २०१६ मध्ये रतन टाटा यांची आरएनटी असाेसिएट्स ही खासगी गुंतवणूक कंपनी व युनिव्हर्सिटी आॅफ कॅलिफाेर्निया आॅफ द रिजेंट्सने भारतात यूसी-आरएनटी फंडच्या रूपाने नवीन स्टार्टअप, नवीन कंपन्या आणि अन्य उद्याेगांना निधी देण्यासाठी साथ दिली. जो स्टार्टअप त्यांची साथ मिळण्यात यशस्वी हाेताे, त्यांना आर्थिक मदतीपेक्षाही रतन टाटा यांच्या अनुभवाची माेठा खजिना प्राप्त हाेताे. भविष्यात त्यांच्या यशस्वी हाेण्याची शक्यतादेखील वाढते.

बातम्या आणखी आहेत...