आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रतनलाल सी बाफणा ज्वेलर्सचा डेटा हॅक, हॅकरने मागितली 60 लाखांची खंडणी

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - शहरातील रतनलाल सी. बाफणा ज्वेलर्समधील 80 संगणाकांचा डेटा परदेशातील हॅकर्सने 25 नोव्हेंबर रोजी हॅक केला. हा डेटा परत मिळवुन देण्यासाठी हॅकरने प्रती संगणक 980 डॉलर (सुमारे 65 लाख) रुपयांची खंडणी मागितली आहे. या प्रकरणी बाफणा ज्वेलर्सचे संचालक सिद्धार्थ बाफणा यांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा प्रकारे खंडणी मागण्याचा शहरातील हा पहिलाच प्रकार समोर आला आहे.

बाफणा यांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 नोव्हेंबर रोजी शोरुममधील 80 संगणक काही वेळासाठी बंद झाले होते. यानंतर बिलींग सॉफ्टवेअर, कस्टमर डिटेल्स, ट्रान्झॅक्शन डिटेल्स व अकाऊंट या विभागातील संगणकांतून डेटा हॅक झाला. नंतर याच संगणाकांमध्ये नोटपॅड फाईल अपलोड झाली होती. या नोट पॅडवर हॅकरने खंडणीची मागणी केली आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली. हॅकरने मागितलेल्या खंडणीच्या नोटपॅड फाईलची कॉपी देखील बाफणा यांनी पोलिसांकडे दिली आहे. अशा प्रकारे खंडणी मागण्याचा शहरातील हा पहिलाच प्रकार समोर आला आहे. यानंतर बाफणा ज्वेलर्सतर्फे तत्काळ पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...