अमरावती / मुलींनाच शपथ का..? त्यापेक्षा मुलींना त्रास देणार नाही, अशी शपथ मुलांना द्यायला हवी- पंकजा मुंडे

  • अमरावतीमधील एका शाळेत मुलींना प्रेम, प्रेम विवाह न करण्याची शपथ देण्यात आली

दिव्य मराठी वेब टीम

Feb 14,2020 03:58:00 PM IST

अमरावती- आज प्रेमाचा दिवस आहे. आजच्या दिवसाचे तरुण-तरुणींमध्ये खूप आकर्षण असते. आपल्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी अनेकजण आजच्या दिवसाची वाट पाहत असतात. पण, अमरावतीच्या एका कॉलेजमधील विद्यार्थ्यांनींना अजब शपथ देण्यात आल्याची घटना घडली आहे. 'मी प्रेम आणि प्रेमविवाह करणार नाही,' अशी शपथ देण्यात आली. त्यावर आता माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी संताप व्यक्त केला आहे. मुलींकडून अशा शपथा घेण्यापेक्षा 'मी मुलींना त्रास देणार नाही,' अशी शपथ मुलांकडून घ्यायला हवी अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे येथील महिला व कला महाविद्यालयाच्या विद्यार्थींनी चक्क व्हॅलेंटाईनडेच्या पूर्वसंध्येला प्रेम न करण्याची तसेच प्रेमविवाह न करण्याची शपथ देण्यात आली. मात्र यावर पंकजा मुंडे यांनी संताप व्यक्त केला आहे. पंकजा मुंडेंनी यावर ट्विट केले की, "अमरावतीतील चांदुर येथील शाळेत मुलींना प्रेम आणि प्रेम विवाह न करण्याची शपथ देणे, हा विचीत्र प्रकार घडला आहे. शपथ मुलींनाच का? आणि ती ही प्रेम न करण्याची... त्या पेक्षा मुलांनी शपथ घ्यायला पाहिजे की एकतर्फी प्रेमातून मुलींना त्रास देणार नाही. कोणावर अॅसिड फेकणार नाही, जिवंत जळणार नाही. वाकड्या नजरेने बघणार नाही आणि जर कोणी बघितलं तर त्याला जबरदस्त जवाब देणार.

X
COMMENT