आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रथयात्रा : 45 फूट उंच आणि 16 चाकांचा असतो भगवान जगन्नाथ यांचा रथ, तिन्ही रथांचे आहे खास वैशिष्ट्य

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदू धर्मातील चार धाममध्ये जगन्नाथ पुरीचे विशेष महत्त्व आहे. मान्यतेनुसार भगवान विष्णू रामेश्वरममध्ये स्नान, द्वारकेत शयन, बद्रीनाथमध्ये ध्यान आणि पुरीमध्ये भोजन करतात. भगवान जगन्नाथाचे दर्शन घेतल्याशिवाय चारधाम यात्रा पूर्ण मानली जात नाही. आषाढ शुक्ल द्वितीयापासून जगन्नाथ रथयात्रा प्रारंभ होते. रथयात्रेमध्ये बलराम यांच्या रथाला 'ताळध्वज' म्हणतात. देवी सुभद्रा यांचा रथाला ‘दर्पदलन’ तर भगवान जगन्नाथ यांचा रथाला 'नंदीघोष' किंवा 'गरुडध्वज' म्हणतात. हा रथ सर्वात मागे राहतो. या तिन्ही रथाची उंची, चाके आणि आकृती वेगवेगळी असते.


भगवान जगन्नाथ यांचा रथ - नंदीघोष, गरुडध्वज, कपिध्वज पताका
चाके- 16, लाकडाचे तुकडे- 832 नग, उंची- 13.5 मीटर, लांबी व रुंदी- 34 फूट 6 इंच बाय 34 फूट 6 इंच, आच्छादन कापडी- लाल व पिवळा, संरक्षण- गरुड, रथाचे नाव- दरुका, ध्वजाचे नाव- त्रिलोक्य मोहिनी, दोराचे नाव- सारवुजडा


बलभद्रांचा रथ- तळध्वज
रथाला चाके- 14, लाकडाचे तुकडे 763 नग, रथाची उंची 13.2 मीटर, लांबी व रुंदी- 33 फूट बाय 33 फूट, कापडी आच्छादन- लाल, निळसर हिरवा, संरक्षण- वासुदेव, चालकाचे नाव- आताली, ध्वज- उन्नानी, दोराचे नाव- बसुकी.


देवी सुभद्रा यांचा रथ - दर्पदालन/पद्मध्वज 
रथाला चाके - 12, लाकडाचे तुकडे 593 नग, रथाची उंची- 12.9 मीटर, लांबी व रुंदी- 31 फूट 6 इंच बाय 31 फूट 6 इंच, कापडी आच्छादन- लाल व काळा, संरक्षण- जयदुर्ग, सारथी- अर्जुन, ध्वज- नंदबिका, दोराचे नाव- स्वयंमुद्रा.

बातम्या आणखी आहेत...