आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वयाच्या 16 व्या वर्षी अॅक्ट्रेस बनली होती रती, नव-याच्या अत्याचाराला कंटाळून लग्नाच्या 30 वर्षांनी घेतला घटस्फोट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः अमिताभ बच्चनसोबत 'कुली' या चित्रपटात झळकलेली बॉलिवूड अभिनेत्री रती अग्निहोत्री 59 वर्षांची झाली आहे. 10 डिसेंबर 1960 रोजी बरेलीत जन्मलेल्या या अभिनेत्रीने 1981मध्ये 'एक दूजे के लिए' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले होते. पदार्पणाच्या चार वर्षांनी म्हणजे 1985 मध्ये रतीने बिजनेसमन आणि आर्टिकेक्ट अनिल वीरवानीसोबत लग्न केले. लग्नानंतर रतीने चित्रपटांत काम करु नये, अशी तिच्या नव-याची इच्छा होती. 1986 मध्ये रतीने मुलाला जन्म दिला. त्यानंतर तिने दोन वर्षे चित्रपटांत काम केले, पण यावरुन रती आणि तिच्या नव-यात कायम भांडण व्हायचे. 

  • मुलाच्या जन्मानंतर नव-याने सुरु केली होती मारहाण...

मुलाच्या जन्मानंतर रती अग्निहोत्रीला तिच्या नव-याने मारहाण सुरु केली होती. रतीने पती अनिल वीरवानीच्या विरोधात 2015 मध्ये चाकुने हल्ला केल्याचा आणि धमकावल्याचा आरोप लावला होता. यापूर्वीही तिने घरगुती हिंसाचार, मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार पोलिसांत दिली होती. लग्नाच्या तब्बल 30 वर्षांनी रतीने नव-यापासून घटस्फोट घेतला. 

  • मुलासाठी सहन करत राहिली नव-याचा अत्याचार..

रतीने अनेक वर्षे नव-याचा अत्याचार सहन केल्यानंतर 2015 मध्ये एफआयआर दाखल केली. यावेळी एका मुलाखतीत तिने सांगितले होते, की ती दीर्घ काळापासून नव-याचा अत्याचार सहन करत आहे. पण आता सर्व मर्यादा संपल्या आहेत. रतीने सांगितले होते की, ती मुलगा तनुजसाठी एवढी वर्षे गप्प राहिली कारण ती त्याला या भांडणापासून दूर ठेऊ इच्छित होती.

  • वयाच्या 10 व्या वर्षापासून रतीने सुरु केली होती मॉडेलिंग...

रतीने वयाच्या अवघ्या 10 व्या वर्षी मॉडेलिंग क्षेत्रात पाऊल ठेवले होते. तिच्या वडिलांची मुंबईहून चेन्नईला बदली झाली होती. येथे तिने तिचे शालेय शिक्षण पूर्ण केले. शाळेत असताना ती अनेक स्टेज शोमध्ये सहभागी झाली. याचकाळात तिला 'पुदिया वरपुकल' या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. त्यावेळी ती केवळ 16 वर्षांची होती. रती निर्माता आणि दिग्दर्शक अतुल अग्निहोत्रीची चुलत बहीण आहे. अतुल हा सलमानची बहीण अलविराचा नवरा आहे.

  • या चित्रपटांमध्ये झळकली आहे रती...

रतीने हिंदीशिवाय तामिळ, तेलुगु, मल्याळम, कन्नड, बंगाली, भोजपुरी आणि इंग्लिश चित्रपटांत काम केले. स्वामीदादा, अय्याश, मजदूर, मुझे इंसाफ चाहिए, कुली, बॉक्सर, मेरा फैसला, जॉन जानी जनार्दन, करिश्मा कुदरत का, एक से भले दो, तवायफ, दिल तुझको दिया, दादागिरी, यादें, चुपके से, कांटे, सोचा न था, पहचान, जिम्मी, लक, बिन बुलाए बराती, शादी के साइड इफेक्ट्स, सिंह इंज ब्लिंग हे तिचे गाजलेले हिंदी चित्रपट आहेत.