वाशीतील शिधावाटप दुकानावर / वाशीतील शिधावाटप दुकानावर कारवाईची मागणी

May 28,2011 03:46:11 PM IST

वाशी परिसरातील ३२ शिधावाटप दुकानांत वितरित करण्यासाठी भिवंडी येथील गोदामातून उचलेल्या ८० क्विंटल अन्नधान्याचा अपहार करणाऱ्या आकाश ग्राहक सहकारी संस्थेवर कारवाई करावी, अशी मागणी करणारा अहवाल ठाण्यातील उपनियंत्रक शिधावाटप अधिकाऱ्यांनी मुंबईतील शिधावाटप नियंत्रक व संचालक नागरी पुरवठा विभागाला पाठविला आहे .माहितीच्या अधिकारातून हे उघड झाले आहे .

X