Home | National | Other State | ratna verma earning 13 lakh rupee per month

गरीबीमुळे त्रस्त झाली होती ही महिला, आता दर महिन्याला करते 13 लाख रूपयांची कमाई; 1200 महिलांना दिले स्वयंरोजगाराचे धडे

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 11, 2019, 12:00 AM IST

साडे 4 हजार रूपये होती पहिली इनकम, प्रॉडक्टची होते अॅडव्हान्समध्ये बुकिंग

 • ratna verma earning 13 lakh rupee per month


  रायपूर : जिद्द, आत्मविश्वास आणि चिकाटी असेल तर मोठ्यातल्या मोठ्या अडचणींवर मात करता येते. रत्ना वर्मा याचे एक उदारहण आहे. यांनी अडचणींची सामना करत स्वयंसेवी गटाची सुरुवात केली आणि व्यवसाय सुरु केला. सोबतच मजूर परिवारातील महिलांना आपल्यासोबत घेऊन त्यांनाही आर्थिकरित्या सक्षम बनवले.

  अशाप्रकारे सर केला यशाचा मार्ग

  - अमेरी गावातील रत्ना स्वयंसेवी गट चालवते. या गटाद्वारे मशरूमचे उद्पादन आणि जैविक औषधी तयार करत दर महिन्याला 13 लाख रूपयांची कमाई करत आहे.

  - सध्या यांच्या समुहामध्ये 13 महिला कार्यरत आहेत. पण अप्रत्यक्षपणे 50 पेक्षाही अधिक महिलांना यांच्या व्यवसायातून लाभ होत आहे.

  - रत्ना वर्मा सांगतात की, घराची आर्थिक परिस्थिती हालाकीची होती. तेव्हा घरीच काहीतरी करण्याचा निश्चय केला. यादरम्यान मशरूमची शेती केल्याने चांगले उत्पन्न मिळत असल्याचे गावातील एकाने सांगितले होते.

  - कामाची सुरुवात करण्यासाठी पैशांची चणचण भासली होती. यामुळे आजीविका मिशन बिहानसोबत काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर स्वयंसेवी गट स्थापना केली आणि इतर महिलांना त्यामध्ये सामावून घेतले.

  - या व्यवसायातून पहिल्या महिन्यात साडे चार हजार रुपये कमाई झाल्याचे त्यांनी सांगितले. तेव्हा त्यांच्या या प्रॉडक्टची विक्री फक्त लोकांच्या घरापर्यंतच होती.


  पॅकिंग करून मशरूमची करतात विक्री

  - रत्ना यांनी सांगितले की, काही काळानंतर मशरूमची पॅकिंग करून हॉटेल आणि दुकानांमध्ये त्याची विक्री करत होते. यामुळे उत्पन्नात चांगला नफा होत होता. गुणवत्ता असल्यामुळे मागणी वाढली. आता मशरूमची अॅडव्हान्समध्ये बुकींग होत आहे.

  - रत्ना आता मशरूमचे लोणचे. मशरूमचा पोषक आहार. पावडर आणि फेसपॅक देखील तयार करत आहेत. प्रॉडक्टसाठी बिहान योजनेअंतर्गत पॅकिंग, लेबलिंगसह मार्केटमध्ये दाखल करण्यात मदत होत आहे.

  कृषी मेळाव्यात लावले आहेत स्टॉल्स, जैविक औषधांचे करत आहे निर्मिती

  - एक मॉडल स्वंयसहायता समुहाच्या रूपात बिहान बाजार, कृषीमेळा, लोक सुराज आणि मिशन 25-25 इत्यादी कार्यक्रमात मशरूमच्या उत्पादनांचा स्टॉल लावला असल्याचे रत्ना यांनी सांगितले.

  - रत्नाची आपल्या गावात कृषी मित्र म्हणून निवड करण्यात आली आहे. प्रत्येक घरी जाऊन महिलांना स्वयंरोजगाराचे धडे देत आहे. याशिवाय गावातील लोकांना शेती व्यवसायासाठी प्रेरित करत आहे.

  - रत्ना मशरूमच्या उत्पादनांसोबत शेण, गोमुत्र, झाडांचा पालापाचोळा इत्यादी पासून निमास्त्र, ब्रम्हास्त्र सारख्या जैविक औषधांची निर्मिती करत आहे. एका मास्टर ट्रेनच्या रूपात 1200 पेक्षा अधिक महिलांना त्यांनी प्रशिक्षण दिले आहे.

Trending