आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुलडाणा जिल्ह्यात रातरागिण्यांनी उचलले अंधारात धाडसी पाऊल, मशालीची ज्योत पेटवून केला बंधन मुक्तीचा निर्धार

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • बुलडाण्याच्या मार्गावरुन चालल्या रातरागिण्या

बुलडाणा- माँ जिजाऊंच्या बुलडाणा जिल्ह्यात स्त्री पुरुष समानतेच्या पुरस्कत्या ताराबाई शिंदे नगरीत दै. दिव्य मराठीने मौन सोडू चला बोलू कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या उपक्रमांतर्गत अंधारावर चालत नाइट वॉक करत महिलांनी अंधारात पाऊल उचलले. आज २२ डिसेंबर रोजी सायंकाळी ७  वाजता जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुल येथे पाच महिलांनी मशालींची ज्योत पेटवून या नाइट वॉकला सुरुवात करण्यात आली. दिव्य  मराठी च्या पुढाकाराने बुलडाणा सिटिझन फोरम च्या सहकाऱ्यांत हा नाइट वॉक निघाला होता.खऱ्या अर्थाने जिजामाता क्रीडा संकुल येथे सायंकाळी ६.३० वाजता पासून विविध कार्यक्रमाद्वारे महिला प्रबोधनाचा कार्यक्रम शाळा, महाविद्यालयाने  गीत, नाट्याचे सादरीकरण, स्वसंरक्षणाचे धडे आदींचे प्रात्यक्षिकाद्वारे सादर केला. प्रातिनिधीक स्वरुपात एक मनोगत आयुर्वेद महाविद्यालयाची  विद्यार्थिनी  प्रिया मापारी हिने मांडले. तर मोहिनी मेश्राम हिने गीत सादर केले. समाज कल्याणच्या  सहायक आयुक्त अनिता राठोड, कक्ष अधिकारी विद्या माळी, कक्ष अधिकारी पुष्पा गायकवाड, मुख्याध्यापिका स्नेहलता मानकर, परिचर्या मल्टिपर्पज फाउंडेशनच्या विजया काकडे यांनी ज्योत पेटविली. त्यानंतर दिव्य मराठी च्या संपादक संजय आवटे यांची नाइट वॉकची प्रस्तावना रातरागिणींसमोर दिव्य मराठी चे जिल्हा प्रतिनिधी लक्ष्मीकांत बगाडे यांनी मांडली. मान्यवर महिलांनी आपले मत व्यक्त केल्यानंतर रातरागिणींचा नाइट वॉकला सुरुवात झाली. सर्वात समोर ज्योत घेऊन जिजाऊंच्या वेशभूषेत राधिका रामेश्वर उबरहंडे व पहल सागर काळवाघे या दोन मुली घोड्यावर सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रमाचे संचालन अंजली परांजपे, गायत्री सावजी, ज्योती पाटील यांनी केले. सुरेखा खोत, प्रा.डॉ.इंदुमती लहाने, प्रा.डॉ.वंदना काकडे, अनिता शेळके, प्रजापिता ब्रम्ह कुमारीच्या उर्मिला दिदी, डॉ.स्मिता आगाशे, गौरी शिंगणे, मृणालिनी सपकाळ, डॉ.वैशाली पडघान, डॉ.वैभवी  कोलते, जया खरात, शाहिना पठाण, गौरी शिंगणे, डॉ.सुषमा झगडे, नंदाताई चाटे, आशा शहाणे, नलिनी कुलथे, सुचिता पबीतवार, विजया चव्हाण, नलिनी काळवाघे, लता भोसले बाहेकर, डॉ. माधवी जवरे, अनिता कापरे, डॉ.छाया महाजन, सुरेखा निकाळजे, आशा गायकवाड, आर.आर.सातव, सरस्वती सातव, दीपाली देशपांडे, डॉ.राखी कुळकर्णी, लता जोशी, मनिषा शिंगणे, साधना डव्हळे, अॅड.वंदना तायडे,विजया इंगोले, डॉ.संजीवनी शेळके,डॉ.नंदिनी रिंढे, डॉ.मंजूश्री खोब्रागडे, माधुरी घोरपडे, अॅड.जयश्री राखोंडे, शीतल सोनोने, डॉ.अंजली गहरवार, डॉ. दिशा चोपडे, डॉ.वर्षा शिरसाट, डॉ.साधना भवटे, डॉ.वर्षा खासबागे, स्मिता चेकेटकर, डॉ.पल्लवी जोशी, डॉ.गायत्री साबळे, अनुराधा जाधव,संगीता काळणे, ज्योती धोरण, अॅड.किरण राठोड ऊमक, पूर्वा जैस्वाल, विजया राठी,मध काळवाघे यांच्यासह बुलडाणा सिटिझन फोरम, लेक माझी अभियान, महाविद्यालय, नर्सिंग स्कुल, उच्च प्राथमिक शाळा, सामाजिक महिला संघटनांचा सहभाग आदींनी नाइट वॉकच्या यशस्वितेकरता परिश्रम घेतले. कोमल झंवर, विजया काकडे, पुष्पा गायकवाड, विद्या माळी, स्नेहलता मानकर, वृषाली बोंद्रे, गौरी शिंगणी, जयश्री शेळके, शाहिना पठाण, विजया राठी, अनिता शेळके आदींनी मशाल पेटवली.बुलडाण्याच्या मार्गावरुन चालल्या रातरागिण्या

जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुल येथून रातरागिणी नाइट वॉक ला सुरुवात झाली. संगम चौक, जयस्तंभ चौक,स्टेट बँक चौक, तहसील चौक या मार्गे एडेड हायस्कूल समोर हुतात्मा स्मारक येथे या नाइट वॉक चा समारोप आकाशात फुगे सोडून करण्यात आला. या नाइट वॉक दरम्यान रस्त्याने पिण्याचे पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. महिलांवरील गीते वाजवण्यात आली होती.
 

बातम्या आणखी आहेत...