आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंधारावर चालून गेल्या रातरागिणी; हजारो महिलांचा जालना शहरामध्ये नाइट वॉक

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • पोलिस कर्मचाऱ्यांच्या नाटिकेने वेधले सर्वांचे लक्ष

जालना- मौन सोडू, चला बोलू हे अभियान दैनिक दिव्य मराठीने हाती घेतले आहे. या अंतर्गत महिलांसाठी रविवारी रात्री अायोजित “नाइट वॉक’ मध्ये शहर आणि जिल्ह्यातील हजारो महिला सहभागी झाल्या. मामा चौक येथून या वॉकचा मशाल पेटवून शानदार शुभारंभ करण्यात आला. या वेळी उद््घाटनप्रसंगी महिला तसेच युवतींनी गीत, नृत्य सादर केले. तर जालना पाेलिस दलाच्या वतीने पथनाट्याचे सादरीकरण केले. 

असा होता मार्ग
 
जालना शहरातील मुख्य असलेला मामा चौक- वीर सावरकर चौक- टांगा स्टँड- श्रीराम मंदिर- मिशन हॉस्पिटल- झाशी राणी पुतळा- जिजाऊ प्रवेशद्वारासमोरून- ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहाेचली. या वेळी आकाशात फुगे सोडून समारोप करण्यात आला.

पोलिस बँड ठरला आकर्षण
 
जालना पोलिस दलातील पोलिस बँड पथकाच्या जवानांनी बँड वर देशभक्तीपर गीतांची धून वाजवली. या बँडच्या सादरीकरणाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. बँडचा ध्वनी कानावर पडताच या ठिकाणी मोठी गर्दी होण्यास सुरुवात झाली.

बातम्या आणखी आहेत...