आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'रात्रीस खेळ चाले 2'मधील माई-अण्णांचा हा रोमँटिक अंदाज पाहिलात का तुम्ही! व्हिडिओ होत आहेत व्हायरल

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः झी मराठी वरील ‘रात्रीस खेळ चाले 2’ या मालिकेने अल्पावधीतच लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. मालिकेच्या पहिल्या पर्वाला प्रेक्षकांनी जसा भरभरून प्रतिसाद दिला तसंच या 2 भागावर देखील प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करत आहेत. याचं बहुतांश श्रेय हे मालिकेतील कलाकारांनाही जातं. मुख्य म्हणजे 'रात्रीस खेळ चाले 2', मधील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष दाद मिळत आहे. ही मालिका आता एका विलक्षण वळणावर आली आहे. जरी मालिकेत अण्णा आणि माई यांचं पटत नसलं तरी ऑफस्क्रीन दोघे एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत आणि सेटवर सगळ्यांसोबत ते तितकीच धम्माल करताना दिसतात.


गेले काही दिवस अण्णा आणि माई यांचे सेटवरील काही टिकटॉक व्हिडिओज तुफान व्हायरल होत आहेत. या दोघांची धम्माल केमिस्ट्री पाहून नेटकरी देखील त्यांच्यावर फिदा झाले आहेत. त्यांच्या या व्हिडिओजना चाहत्यांचा भरगोस प्रतिसाद मिळत आहेत. झी मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर दोन व्हिडिओ पोस्ट करण्यात आले आहे.

‘निसर्गराजा ऐक सांगते..’ या प्रसिद्ध गाण्यावर अण्णा व माईंचा रोमान्स पाहायला मिळतोय. यासोबतच ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं..’ या गाण्यावरही अण्णा-माईंनी व्हिडिओ बनवला आहे. या जुन्या गाण्यांवरील अण्णा आणि माईंचे  कमाल हावभाव या व्हिडिओजचे हायलाईट आहे. अण्णा आणि शेवंताची ऑनस्क्रीन केमिस्ट्री जितकी कमाल आहे तितकीच अण्णा आणि माईंच्या टिकटॉक व्हिडिओजची चर्चा सध्या होत आहे.

या मालिकेत माधव अभ्यंकर अण्णा नाईकांची तर शकुंतला नरे माईंची भूमिका साकारत आहेत.  

बातम्या आणखी आहेत...