आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
एंटरटेन्मेंट डेस्कः झी मराठी वरील ‘रात्रीस खेळ चाले 2’ या मालिकेने अल्पावधीतच लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. मालिकेच्या पहिल्या पर्वाला प्रेक्षकांनी जसा भरभरून प्रतिसाद दिला तसंच या भागावर देखील प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करत आहेत. याचं बहुतांश श्रेय हे मालिकेतील कलाकारांनाही जातं. मुख्य म्हणजे 'रात्रीस खेळ चाले 2', मधील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष दाद मिळत आहे.
नेने वकिलांच्या मदतीने शेवंताला नाईकांच्या वाड्यासमोरच घर मिळतं. एकीकडे माई मात्र अण्णांना पूर्णपणे ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत, दुसरीकडे शेवंता हार न मानता धीटपणे सगळ्या परिस्थितीला सामोरी जातेय. माईंच्या कणखरपणापुढे अण्णा देखील काहीसे हतबल झालेले दिसत आहेत. माई आणि शेवंताची खुन्नस मालिकेची रंजकता अजून वाढवत आहेत. अशातच शेवंताने सोशल मीडियावर तिचा, माई आणि अण्णांचा एकत्र एक फोटो शेअर केला आहे आणि चाहत्यांना त्या फोटोला कॅप्शन द्यायला सांगितलं आहे.
या झक्कास फोटोवर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. शेवंता अर्थातच अभिनेत्री अपुर्वा नेमळेकर हिने शेअर केलेल्या फोटोला चाहत्यांनी आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन, पहिली शेर दुसरी सव्वा शेर नवरा पावशेर, आले रहायला शेजारी झोंबले इंदूच्या नाका...तुम्ही चिडून आण्णा गोळी नका घालू माका, एक तरफ है घरवाली एक तरफ बहारवाली अशा एकाहून एक प्रतिक्रिया दिल्या आहेत.
अण्णा आणि शेवंताच्या जुगलबंदीमध्ये अण्णांचं काय होणार हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.