आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रात्री अचानक गायब झाला पेशंट, शोधण्याऐवजी डॉक्टरांनी बेपत्ता सांगून फाइल केली बंद, मग सकाळी आढळल्यावर त्याची अवस्था पाहून सगळेच झाले भयचकित

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जमशेदपूर - एमजीएम रुग्णालयाच्या इमर्जन्सी वॉर्डमध्ये हॉस्पिटल स्टाफच्या गलथान कारभाराचा प्रकार समोर आला आहे. येथे 35 वर्षीय चंद्रशेखर शर्मा यांचा मृतदेह रुग्णालयाबाहेरच्या नळाजवळ आढळला. त्यांचा मृतदेह पाहून सगळेच भयचकित झाले होते. त्यांचा देह उंदरांनी कुरतडून विद्रूप करून टाकला होता. रुग्णाच्या कुटुंबीयांनी सांगितले, तो रात्री बाहेर निघाला, पण नळाजवळ पडला. रात्रभर मोकळ्या आकाशाखाली तो नळाच्या पाण्याने भिजत राहिला. थंडीमुळे त्याचा मृत्यू झाला.

 

रुग्णाला शोधलेही नाही, बेपत्त सांगून फाइल केली बंद
- रुग्ण आढळला नाही म्हणून हॉस्पिटल कर्मचाऱ्यांना त्याचा शोधही घेतला नाही. यामुळे उंदरांनी त्याचे शरीर कुरतडून काढले. हॉस्पिटल प्रशासनावर बेजबाबदारपणाचा आरोप करत कुटुंबीयांनी गोंधळ घातला. जेव्हा कुटुंबीयांनी चंद्रशेखरला रुग्णालयात दाखल केले, तेव्हा तो बेशुद्धावस्थेत होता. त्याला दारूचे व्यसन होते. कुटुंबीय म्हणाले की, त्याला इमर्जन्सी वॉर्डाच्या बेड नंबर-14 वर ठेवण्यात आले होते. रात्री 11 वाजता तो वॉर्डातून निघून गेला. कोणत्याही डॉक्टर, नर्स वा कर्मचाऱ्याला चाहूलसुद्धा लागली नाही, उलट त्यांनी रुग्ण बेपत्ता असल्याचे सांगून फाइलच बंद करून टाकली. सकाळी कुटुंबीय रुग्णालयात पोहोचले तेव्हा तो नळाजवळ मृतावस्थेत आढळला.

 

रुग्णालयाचा अमानुष चेहरा, दिले हे स्पष्टीकरण
एमजीएमचे उपाधीक्षक डॉ. नकुल चौधरी म्हणाले की, दाखल झालेला रुग्ण मद्यपी होता. तो आधीही रुग्णालयात आलेला आहे. तो बेशुद्धावस्थेत होता.
कुटुंबीय त्याला पाहून निघून गेले होते. रात्री रुग्ण वॉर्डातून पळून गेला. 

 

 

बातम्या आणखी आहेत...