आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रावसाहेब दानवे, देसाई, शेवाळे यांना केंद्रात मिळू शकते मंत्रिपद; शिवसेनेकडून यंदा हाेणार दाेन मंत्रिपदावर दावा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आगामी विधानसभा निवडणूक आणि केंद्रातील भाजप सरकारला राज्यातून मिळालेला मोठा कौल या पार्श्वभूमीवर मोदी सरकारच्या दुसऱ्या टप्प्यातील मंंत्रिमंडळात महाराष्ट्राला अर्ध्या डझनहून अधिक मंत्रिपदे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मावळत्या मंत्रिमंडळात राज्यातून भाजपचे पाच, तर शिवसेनेचे एक मंत्री होते. त्यापैकी शिवसेनेचे अवजड उद्योगमंंत्री अनंत गिते यांचा पराभव झाला असला तरी नितीन गडकरी आणि सुभाष भामरे या भाजपच्या मंत्र्यांचा विजय झाला आहे. नवीन मंत्रिमंडळात शिवसेनेच्या वतीने एकापेक्षा अधिक मंत्रिपदांची मागणी होण्याची शक्यता आहे. यात संसदेतील सेनेचे गटनेते अनिल देसाई किंवा तरुण चेहरा म्हणून राहुल शेवाळे यांची नावे पुढे येत आहेत. भाजपच्या वतीने विद्यमान मंत्री नितीन गडकरी, पीयूष गोयल, प्रकाश जावडेकर, हंसराज अहिर यांच्यासह प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या नावाचीही केंद्रीय मंत्रिपदासाठी विचार होऊ शकतो.

 

नितीन गडकरी, भाजप
> १९८९ पासून विधान परिषद सदस्य
>  युती सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाममंत्री
> २०१० ते २०१३ मध्ये भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष
> मावळत्या मंत्रिमंडळात रस्ते विकास, महामार्ग, जलवाहतूक, ग्रामविकास ही मंत्रिपदे सांभाळली.

 

रावसाहेब दानवे
> पाच वेळा संसदेवर विजयी
> २०१४ मध्ये ग्राहक संरक्षण, अन्न व पुरवठा मंंत्रिपद
> २०१५ मध्ये मंत्रिपद सोडून प्रदेशाध्यक्ष जबाबदारी 

 

प्रकाश जावडेकर
> २०१६ पासून मनुष्यबळ विकासमंत्री
> भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते व राज्यसभा सदस्य
> २०१४ पासून माहिती व तंत्रज्ञान राज्यमंत्री
> २०१८ मध्ये राज्यसभेवर नियुक्ती 

 

मंत्रीपदाच्या शर्यतीत असणाऱ्यांची नावे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा......

बातम्या आणखी आहेत...