आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day: अक्षय कुमारसोबत होते या अॅक्ट्रेसचे अफेअर, नंतर या व्यक्तीची बनली दुसरी पत्नी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री रवीना टंडन हिने वयाची 43 वर्षे पूर्ण केली आहेत. 26 ऑक्टोबर 1974 रोजी निर्माते रवी टंडन यांच्या घरी झाला. रवीनाने 1991 साली 'पत्थर के फूल' या चित्रपटातून आपल्या सिनेकारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटात अभिनेता सलमान खान तिचा हीरो होता. पण तिला खरी ओळख मिळाली ती 'मोहरा' (1994) या चित्रपटातून. या चित्रपटाचे चित्रीकरण संपता संपता अक्षय आणि रवीना खासगी आयुष्यात जवळ आले. दोघांचे अफेअर तीन वर्षे चालले पण नंतर त्यांचे ब्रेकअप झाले. त्यानंतर रवीना चित्रपट वितरक अनिल थडानी यांची दुसरी पत्नी बनली.

 

रवीना-अक्षयने या चित्रपटांमध्ये केले एकत्र काम...
'मोहरा'नंतर रवीना आणि अक्षय यांनी 'खिलाडियों का खिलाडी' (1996), 'दावा' (1997), 'कीमत' (1998), 'बारूद' (1998) या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. प्रत्येक चित्रपटासोबत त्यांच्यातील जवळीक वाढत गेली. पण याच काळात अक्षयचे रवीनाव्यतिरिक्त दुस-या अभिनेत्रीसोबत अफेअर सुरु झाले होते. असे म्हटले जाते, की याचकाळात अक्षय रवीनासोबतच शिल्पा शेट्टीलासुद्धा डेट करत होता. तीन वर्षे रवीनासोबत अक्षय रिलेशनशिपमध्ये होता. 1996 साली अक्षय, रवीना आणि रेखा स्टारर 'खिलाडियों का खिलाडी' हा चित्रपट रिलीज झाला आणि अक्षय-रेखाच्या लव्ह स्टोरीची चर्चा मीडियात सुरु झाली. शिल्पा शेट्टी पाठोपाठ रेखासोबत अक्षयचे नाव जुळल्याने रवीना काळजीत पडली. तिने रेखाला अक्षयपासून दूर राहण्याची ताकीदसुद्धा दिली होती. 1996 साली स्टारडस्टला दिलेल्या मुलाखतीत रवीनाने अक्षयने तिला लग्नाची मागणी घातल्याची कबुली दिली होती. इतकेच नाही तर एका मंदिरात अक्षयसोबत साखरपुडा केल्याचेही तिने सांगितले होते. रवीनाने अक्षयवरच्या प्रेमाची सार्वजनिकरित्या कबुली दिली. पण अक्षयने कधीच त्यांचे हे नाते स्वीकारले नाही. कारण अक्षयला फिल्मी करिअल आणि फिमेल फॅन्स गमावण्याची भीती सतावत होती.

 

अनिल थडानीसोबत रवीनाने थाटले लग्न...
अक्षयपासून विभक्त झाल्यानंतर रवीना 'स्टंप्ड' (2003) या चित्रपटाच्या शूटिंगच्या काळात चित्रपट वितरक अनिल थडानींच्या जवळ आली. अनिल थडानी घटस्फोटित होते. दोघे लवकरच एकमेकांच्या जवळ आले आणि त्यांनी साखरपुडा केला. अशाप्रकारे रवीना अनिल थडांनींची दुसरी पत्नी बनली. आता या दाम्पत्याला राशा ही एक मुलगी आणि रणबीर हा एक मुलगा आहे. विशेष म्हणजे लग्नापूर्वी रवीनाने छाया आणि पूजा या दोन मुलींना दत्तक घेतले होते. आता या दोन्ही मुलींची लग्न झाली आहेत.


या चित्रपटांमध्ये रवीनाने केलंय काम...
रवीनाने 'क्षत्रिय' (1993), 'एक ही रास्ता' (1993), 'दिलवाले' (1994), 'अंदाज अपना अपना' (1994), 'जिद्दी' (1997), 'दुल्हे राजा' (1998), 'सत्ता' (2003), 'जागो' (2004), 'जय हिंद' (2015) सह अनेक चित्रपटांमध्ये काम केलंय. याचवर्षी तिचे 'मातृ' आणि 'शब' हे दोन चित्रपट रिलीज झाले, पण ते सुपरफ्लॉप ठरले. सध्या रवीनाच्या हाती एकही चित्रपट नाही.

 

पुढील स्लाईड्सवर बघा, रवीना-अनिलच्या लग्नाचे फोटोज...

बातम्या आणखी आहेत...