आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Raveena Tandon Decide Fitness Goal For New Year: Raveena Workout Mantra And Her Beauty Tips

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

44 वर्षांच्या रवीना टंडनने नवीन वर्षात केले स्वतःला फिट ठेवण्याचे प्रॉमिस, रोज मारते 30 पुशअप्स, तर 45 मिनिटे ट्रेडमिलवर करते वॉक, गोड, नॉनव्हेज सर्व खाते, फक्त या 2 गोष्टींना लावत नाही हात

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. रवीना टंडन सध्या पती अनिल थडानी आणि मुलगा-मुलगीसोबत आपल्या फार्महाउसवर एन्जॉय करतेय. रवीना सध्या फिटनेसवर लक्ष देत आहे. नवीन वर्षात तिने वर्कआउट गोल ठरवले आहे. रवीनाची गणना 90 च्या दशकातील सर्वात हॉट अॅक्ट्रेसमध्ये होते. पण वयाच्या 44 व्या वर्षीही रवीनाने स्वतःला फिट आणि तरुण ठेवले आहे. रवीनानुसार "मी नेहमी माझे वर्कआउट फॉर्म बदलत राहते, कधी मी स्वीमिंगसाठी जाते तर कधी जिममध्ये जाते. कारण वर्कआउट माझ्या बॉडीसाठी चांगले आहे, यामुळे मी कमीत कमी 45 मिनिटे ट्रेडमिलचा वापर करते. फिट राहण्यासाठी मी  Zumba डान्सही करते. जेवणाविषयी बोलायचे तर मी नॉनव्हेजही खाते आणि कधी-कधी गोडही खाते, पण स्मोकिंग आणि ड्रिकिंगपासून दूर राहते."

 

अशी होते रवीनाच्या सकाळची सुरुवात 
- रवीना आपल्या सकाळची सुरुवात लिंबू पाणी आणि मधाने करते. रवीनानुसार, मुलगा रणवीरच्या जन्माच्या 4 महिन्यांनंतर मी ट्रेडमिलवर चालणे सुरु केले होते. सुरुवातीला मी 20 मिनिटे चालायचे परंतु हळुहळू मी हे 3.5 ते 4 च्या स्पीडवर सेट केरुन 45 मिनिटे केले. 
- रवीना रोज जवळपास 2 तास वर्कआउट करते. तिच्या वर्कआउटमध्ये बेसिक वेट लिफ्टिंग सर्वात महत्त्वाची असते. रवीनानुसार, जेव्हा मी शूटिंगवर जाते तेव्हा माझे ट्रेनर सकाळी 5.45 लाच येतात आणि मी स्वतः ते येण्यापुर्वीच वर्कआउटसाठी रेडी राहते.
- माझा फेव्हरेट वर्कआउट 'डेड लिफ्ट' आहे. यासोबतच मी रोज 20 ते 30 पुशअप्स मारते. पुशअप्स आणि पुश ऑफने माझ्या पुर्ण बॉडीची एक्सरसाइज होते. यामुळे आपले आर्म्स आणि एब्सचे वर्कआउट होते.
- यासोबतच मी आठवड्यातून 3 वेळा बांद्रा येथील क्ले वेलनेस स्पामध्ये जाते. येथे विविध टाइपच्या एक्सरसाइज करुन घेतल्या जातात. यामध्ये कार्डियोसोबतच हाय अँड लो एरोबिक्सचा समावेश आहे. आठवड्यातून एकदा योगा अवश्य करते.
- रवीनानुसार, "मी आठवड्यातून 6 दिवस एक्सरसाइज करते, बॅलेंस डायट घेते. यासोबतच ड्रिंक आणि स्मोकिंगपासून दूर राहते. 8 तास भरपूर झोप घेते. यामुळे सकाळी पुर्णपणे रिफ्रेश वाटते."
- मी स्वतः माझ्या मुलांची देखरेख करते. त्यांच्या मागे पळाल्यामुळे माझा फिटनेस टिकून राहण्यात मदत होते.


कोणत्याही परिस्थितीत रात्री 7.30 वाजता डिनर करुन घेते
- रवीना सांगते की, मी हार्टकोर नॉन-व्हेजिटेरियनर आहे, पण फक्त चिकन आणि फिश खाते. गेल्या काही वर्षांपासून मी माझ्या खाण्याच्या सवयींविषयी खुप स्ट्रिक्ट आहे.
- अनहेल्दी पदार्थ खाऊन मला स्वतःला चीट करायचे नसते. फक्त रविवारी मी कुटूंबासोबत डिनरसाठी जाते. तेव्हा मी काही डेजार्ट घेते.
- मी रात्री 7.30 वाजेपर्यंत डिनर करते. संध्याकाळी 6 नंतर कार्बोहायड्रेटचे पदार्थ अजिबात खात नाही.
- मी माझ्या घरी बनवलेल्या फ्राइंड भेंडीशिवाय अजिबात राहू शकत नाही. माझ्या डायटमध्ये फायबरयुक्त पदार्थांचा समावेश असतो. यासोबतच मी लो-फॅट आणि नॉन फॅट मिल्क पुर्णपणे अव्हॉइड करते.


स्वतःला सुंदर आणि तरुण ठेवण्यासाठी हे करते रवीना 
- वयाच्या 44 व्या वर्षी रवीना खुप सुंदर आहे. स्वतःला सुंदर आणि तरुण ठेवण्यासाठी रवीना काय करते हे तिने सांगितले - "त्वचेला श्वास घेण्याची गरज असते. यामुळे आपण प्रत्येकवेळी मेकअप लावून राहू शकत नाही. "
- "मेकअप आणि चेह-यावर जास्त ऑइल काढण्यासाठी मी जेंटल फोमिंग क्लीन्सरचा वापर करते. यासोबतच मी दिवसातून हलके मॉश्चराइज आणि रात्री गरजेनुसार बेसिक लाइट मॉश्चराइजरचा वापर करते."
- "माझ्या त्वचेवर जास्त एक्सपेरिमेंट करायला मला आवडत नाही. आपल्या त्वचेला काय सूट होते हे आपल्याला माहित पाहिजे. ते कसे वापरावे याचीही माहिती पाहिजे."
- "मला वाटते की, माझी हाइट माझी बेस्ट एसेट(संपत्ती) आहे. ज्या लोकांची हाइट कमी असते, त्यांचे थोडेजरी वजन वाढले तर ते जाड दिसतात."