आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वयाच्या 44 व्या वर्षीही सुंदर दिसते रवीना, त्वचा तरुण राहण्यामागे आहे हे 1 Secret

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. रवीना टंडन 44 वर्षांची झाली आहे. 26 अक्टोबर, 1974 मध्ये मुंबईत तिचा जन्म झाला. 90 च्या दशकातील सर्वात हॉट अभिनेत्रींमध्ये तिची गणना होते. आता तिचे वय 44 वर्षे आहे, तरीही रवीना स्वतः तरुण आणि फिट आहे. रवीनानुसार "मी नेहमी माझा वर्कआउट बदलत राहते, कधी मी स्वीमिंग करण्यासाठी जाते तर कधी जीममध्ये जाते. कार्डियो वर्कआउट माझ्या बॉडीसाठी चांगला आहे, यामुळे मी कमीत कमी 45 मिनिटे ट्रेडमिलचा वापर करते. फिट राहण्यासाठी मी Zumba डान्सही करते. जेवणाविषयी बोलायचे तर मी नॉनव्हेज घेते आणि कधी-कधी गोड खाते, पण स्मोकिंग आणि ड्रिंकिंगपासून नेहमीच दूर राहते."

 

अशी होते रवीनाच्या सकाळची सुरुवात 
- रवीना आपल्या सकाळची सुरुवात लिंबू पाणी आणि मधाने करते. रवीनानुसार, मुलगा रणवीरच्या जन्माच्या 4 महिन्यांनंतर मी ट्रेडमिलवर चालणे सुरु केले होते. सुरुवातीला मी 20 मिनिटे चालायचे परंतु हळुहळू मी हे 3.5 ते 4 च्या स्पीडवर सेट केरुन 45 मिनिटे केले. 
- रवीना रोज जवळपास 2 तास वर्कआउट करते. तिच्या वर्कआउटमध्ये बेसिक वेट लिफ्टिंग सर्वात महत्त्वाची असते. रवीनानुसार, जेव्हा मी शूटिंगवर जाते तेव्हा माझे ट्रेनर सकाळी 5.45 लाच येतात आणि मी स्वतः ते येण्यापुर्वीच वर्कआउटसाठी रेडी राहते.
- माझा फेव्हरेट वर्कआउट 'डेड लिफ्ट' आहे. यासोबतच मी रोज 20 ते 30 पुशअप्स मारते. पुशअप्स आणि पुश ऑफने माझ्या पुर्ण बॉडीची एक्सरसाइज होते. यामुळे आपले आर्म्स आणि एब्सचे वर्कआउट होते.
- यासोबतच मी आठवड्यातून 3 वेळा बांद्रा येथील क्ले वेलनेस स्पामध्ये जाते. येथे विविध टाइपच्या एक्सरसाइज करुन घेतल्या जातात. यामध्ये कार्डियोसोबतच हाय अँड लो एरोबिक्सचा समावेश आहे. आठवड्यातून एकदा योगा अवश्य करते.
- रवीनानुसार, "मी आठवड्यातून 6 दिवस एक्सरसाइज करते, बॅलेंस डायट घेते. यासोबतच ड्रिंक आणि स्मोकिंगपासून दूर राहते. 8 तास भरपूर झोप घेते. यामुळे सकाळी पुर्णपणे रिफ्रेश वाटते."
- मी स्वतः माझ्या मुलांची देखरेख करते. त्यांच्या मागे पळाल्यामुळे माझा फिटनेस टिकून राहण्यात मदत होते.

 

कोणत्याही परिस्थितीत रात्री 7.30 वाजता डिनर करुन घेते
- रवीना सांगते की, मी हार्टकोर नॉन-व्हेजिटेरियनर आहे, पण फक्त चिकन आणि फिश खाते. गेल्या काही वर्षांपासून मी माझ्या खाण्याच्या सवयींविषयी खुप स्ट्रिक्ट आहे.
- अनहेल्दी पदार्थ खाऊन मला स्वतःला चीट करायचे नसते. फक्त रविवारी मी कुटूंबासोबत डिनरसाठी जाते. तेव्हा मी काही डेजार्ट घेते.
- मी रात्री 7.30 वाजेपर्यंत डिनर करते. संध्याकाळी 6 नंतर कार्बोहायड्रेटचे पदार्थ अजिबात खात नाही.
- मी माझ्या घरी बनवलेल्या फ्राइंड भेंडीशिवाय अजिबात राहू शकत नाही. माझ्या डायटमध्ये फायबरयुक्त पदार्थांचा समावेश असतो. यासोबतच मी लो-फॅट आणि नॉन फॅट मिल्क पुर्णपणे अव्हॉइड करते.

 

स्वतःला सुंदर आणि तरुण ठेवण्यासाठी हे करते रवीना 
- वयाच्या 44 व्या वर्षी रवीना खुप सुंदर आहे. स्वतःला सुंदर आणि तरुण ठेवण्यासाठी रवीना काय करते हे तिने सांगितले - "त्वचेला श्वास घेण्याची गरज असते. यामुळे आपण प्रत्येकवेळी मेकअप लावून राहू शकत नाही. "
- "मेकअप आणि चेह-यावर जास्त ऑइल काढण्यासाठी मी जेंटल फोमिंग क्लीन्सरचा वापर करते. यासोबतच मी दिवसातून हलके मॉश्चराइज आणि रात्री गरजेनुसार बेसिक लाइट मॉश्चराइजरचा वापर करते."
- "माझ्या त्वचेवर जास्त एक्सपेरिमेंट करायला मला आवडत नाही. आपल्या त्वचेला काय सूट होते हे आपल्याला माहित पाहिजे. ते कसे वापरावे याचीही माहिती पाहिजे."
- "मला वाटते की, माझी हाइट माझी बेस्ट एसेट(संपत्ती) आहे. ज्या लोकांची हाइट कमी असते, त्यांचे थोडेजरी वजन वाढले तर ते जाड दिसतात."


(नोट: रवीनाच्या फिटनेस टिप्स तिच्या वेगवेगळ्या मुलाखतींमधून घेण्यात आल्या आहेत.)
 

बातम्या आणखी आहेत...