आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Raveena Tandon, Isha Gupta And Other Celebrities Express Anger Over Video Of Nilgai Burial In Bihar

बिहारमध्ये नीलगायीला क्रूरपणे पुरले, याचा व्हिडिओ व्हायरल होताच रवीना टंडन, ईशा गुप्ता आणि इतर सेलिब्रिटींनी व्यक्त केला राग

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : बिहारमध्ये एका क्रूर घटनेमध्ये एका नीलगायीला जिवंत पुरले गेले. आता या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. व्हिडिओमध्ये मुक्या जनावरांवर होणाऱ्या अत्याचारांबद्दल बॉलिवूड सेलेब्सने राग व्यक्त केला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये आधी या नीलगायीला गोळी मारली गेली. पण जेव्हा ती मेली नाही तेव्हा तिला जिवंतच पुरले गेले.  
 
 

हे आहे नीलगायीशी निगडित संपूर्ण प्रकरण... 
बिहारच्या वैशाली जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारीनंतर एमएलए राजकिशोर सिंहने प्रशासन आणि राज्य सरकारसोबत मिळून प्रोफेशनल शूटर हायर केले आणि नीलगायींची हत्या केली. रिपोर्ट्सनुसार सरकारने राज्यात मागच्या चार दिवसांमध्ये 300 नीलगायी मारल्या आहेत. अनेक नीलगायींना फॉरेस्ट डिपार्टमेंटनेदेखील शूट केले आहे. 
 
 

रवीना टंडनने केले ट्वीट... 
रवीनाने व्हिडीओ शेअर करून लिहिले, अमानवीय, जे कुणी या निर्णयामध्ये आहेत. आशा आहे त्यांना आपल्या कर्माचे दुप्पट फळ मिळेल.  

बातम्या आणखी आहेत...