आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समुद्र किनारी असलेल्या आपल्या लग्झरिअस बंगल्याला सजवण्यासाठी रवीनाने स्वतः निवडली प्रत्येक वस्तू, घरातील मंदिर आहे सर्वात खास : Inside Photos

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबईः बॉलिवूडची A लिस्टर अॅक्ट्रेसमध्ये गणली जाणारी अभिनेत्री रवीना टंडन 26 ऑक्टोबर रोजी आपला 44 वा वाढदिवस साजरा करत आहे. 26 ऑक्टोबर 1974 रोजी जन्मलेल्या रवीनाने आपल्या करिअरची सुरुवात सलमान खानसोबत 'पत्थर के फुल' (1991) या चित्रपटातून केली होती. पण तिला खरी ओळख मिळाली ती 1994 मध्ये आलेल्या 'मोहरा' या चित्रपटातून. या चित्रपटाच्या शूटिंगच्या काळात अक्षय कुमारसोबत तिची जवळीक वाढली होती. दोघांचे अनेक दिवस अफेअर होते. पण तीन वर्षांनी त्यांचे ब्रेकअप झाले होते. त्यानंतर चित्रपट वितरक अनिल थडानीसोबत रवीनाने लग्न थाटले. रवीना अनिल थडानींची दुसरी पत्नी आहे. रवीना पतीसोबत मुंबईतील वांद्रा येथे वास्तव्याला आहे. या दाम्पत्याला दोन मुले आहेत. राशा हे तिच्या मुलीचे तर रणबीरवर्धन हे मुलाचे नाव आहे. 

 

एका चित्रपटासाठी 1.5 ते 2 कोटी रुपये घेते रवीना... 
 highlightsindia.com या वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, रवीनाजवळ 6.5 मिलियन डॉलर म्हणजे 48 कोटींची संपत्ती आहे. एका चित्रपटासाठी ती 1.5 ते 2 कोटी रुपये मानधन घेते. अभिनयाशिवाय मॉडेलिंग आणि जाहिरातींमधून तिची कमाई होते.  याशिवायती  ज्वेलरी डिझायनिंगच्या बिझनेसकडे वळली आहे. हेमपुष्पा, रीसो ऑईल, रोटोमॅक आणि आस्था हेअर ऑइल या ब्रॅण्ड्ससाठी तिने जाहिराती केल्या आहेत. काही टीव्ही शोजमध्ये रवीना जज म्हणून झळकली आहे. रवीना आता निवडक चित्रपटांमध्ये झळकत असते, पण तिची लाइफस्टाइल बघण्यासारखी आहे. रवीनाजवळ ऑडी Q7 आणि जगुआर या ब्रॅण्डेड कार आहेत. त्यांची किंमत दीड कोटींच्या घरात आहे. रवीना अखेरची मे 2017 मध्ये आलेल्या 'शब' या चित्रपटात झळकली होती. 


कोट्यवधींच्या बंगल्यात राहते रवीना, स्वतः सजवला आहे आशियाना...   
नवरा आणि दोन्ही मुलांसोबत रवीना मुंबईतील वांद्रास्थित एका आलिशान बंगल्यात वास्तव्याला आहे. या बंगल्याचे नाव आहे 'नीलाया'. निसर्गाशी जवळीक साधणारे घर रवीना आणि तिच्या पतीने डिझाइन करुन घेतले. रवीनाच्या घरात आर्टिस्टिक विचारांची झलक बघायला मिळते.

 

Neelaya Like Kerala Homes:
 मुंबईतील वांद्रा परिसरात असलेल्या रवीनाच्या घरी जेव्हा आम्ही पोहोचले, तेव्हा या कलाप्रेमी अभिनेत्रीच्या क्लासिक चॉईसची झलक बघायला मिळाली. आपल्या घराविषयी रवीनाने सांगितले, "मला माझ्या बंगल्यात फ्यूजन हवे होते. केरळ येथील घरांप्रमाणे मला माझे घर सजवायचे होते. तेथूनच प्रेरणा घेऊन मी माझे घर डिझाइन केले आहे."


Sacred Space: 
निसर्गाशी जवळीक साधणारे रवीनाचे घर आहे. घराच्या आत प्रवेश करताच चोहोबाजुंनी हिरवळ बघायला मिळते. आउटविषयी सांगायचे झाल्यास, काळ्या, लाल आणि ग्रे दगडांनी घराबाहेरील भाग सुशोभित करण्यात आला आहे. येथे एक मंदिरसुद्धा आहे. रवीनाची घरातील ही आवडती जागा आहे. वास्तूशास्त्रानुसार हे मंदिर बनवण्यात आले आहे. सूर्यप्रकाश थेट येऊ शकेल, अशा पद्धतीने मंदिराची रचना करण्यात आली आहे. प्रवेशद्वाराजवळीक श्रीगणेशाची आकर्षक मुर्ती लक्ष वेधून घेते.

 

Peaceful: 
रवीना सांगते, ''खरं तर मुंबईसारख्या शहरांमध्ये क्वचितच हिरवळ बघायला मिळते. तुम्हाला मोठ्या प्रमाणात वृक्ष बघायला मिळत नाही, शिवाय पक्ष्यांची किलकिलाट ऐकू येत नाही. मात्र माझ्या घरात तुम्ही पक्ष्यांची किलकिलाट सहज ऐकू शकतात. हाच अनुभव मला नेहमीपासून हवा होता. सकाळी उठल्यानंतर खिडकीतून हिरवळ आणि फुल बघण्याचे माझे स्वप्न होते. तसे घर आज माझ्याजवळ आहे."

 

पुढील स्लाईड्समध्ये पाहा, रवीना टंडनच्या ड्रीम हाऊसची खास झलक...

बातम्या आणखी आहेत...