आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Juhi Chawla, Raveena Tondon To Anushka Sharma Bollywood Actress Who Married With Billionaires

अनुष्कापासून ते सोनम-जुही चावलापर्यंत, कोट्यधीश-अब्जाधीश बिझनेसमन-क्रिकेटरसोबत जुळले बॉलिवूडच्या या12 तारकांचे सूत, लग्न थाटून झाल्या सेटल्ड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंडस्ट्रीतील अनेक अभिनेत्रींनी ग्लॅमर जगतातील नव्हे तर कोट्यधीश-अब्जाधीश बिझनेसमॅन्ससोबत आपले नाते जोडले. आपले भविष्य सुरक्षित करण्यासाठी एखाद्या अभिनेत्याबरोबर लग्न करण्यापेक्षा बी टाऊनच्या अनेक अभिनेत्रींनी श्रीमंत बिझनेसमनची निवड आपल्या जोडीदाराच्या रुपात केली आहे. श्रीमंत बिझनेसमनबरोबर लग्न करुन या अभिनेत्रींनी आपले फ्यूचर सेफ केले. एका अभिनेत्रीने तर क्रिकेटपटूची आपल्या जोडीदाराच्या रुपात निवड केली आहे.  


या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला बॉलिवूडच्या अशाच काही अभिनेत्रींविषयी सांगतोय, ज्या बिझनेसमनबरोबर लग्न करुन आपल्या आयुष्यात सेटल्ड झाल्या आहेत...  


अनुष्का शर्मा 
अभिनेत्री अनुष्का शर्माने गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहलीसोबत लग्न थाटले. अनुष्काच्या नेटवर्थविषयी बोलायचे झाल्यास, तिची एकुण संपत्ती 220 कोटींच्या घरात आहे.  तर दुसरीकडे तिचा पती विराट कोहलीसुद्धा धनाढ्य आहे. त्याच्याजवळ 42 कोटींची प्रॉपर्टी आणि 18 कोटींची गुंतवणूक आहे. याशिवाय त्याच्याजवळ 9 कोटींच्या सहा लग्झरी गाड्या आहेत. एकुण मिळून त्याची नेटवर्थ 390 कोटींच्या घरात आहे. विराट-अनुष्का हे दोघेही जाहिरात विश्वातील प्रसिद्ध चेहरा आहे. दोघांनी अनेक जाहिरातींमध्ये काम केले आहे. याशिवाय या दोघांनी एकत्रसुद्धा ब-याच जाहिराती केल्या आहे. एकत्र जाहिरात करत असतानाच हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. एका शॅम्पूच्या जाहिरातीत ही जोडी पहिल्यांदा एकत्र दिसली होती. तेथूनच दोघांमध्ये प्रेमांकुर फुलले आणि आता हे दोघे साताजन्माच्या गाठीत अडकले. 


सोनम कपूर 
अभिनेत्री सोनम कपूरचा पती आनंद आहुजा हे प्रसिद्ध बिझनेसमन आहेत. त्यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर अमेरिकेतील अमेजन कंपनीत प्रॉडक्ट मॅनेजर म्हणून काम केले होते. याचवर्षी त्यांनी भारतातील त्यांचे पहिले शू स्टोर ओपन केले आहे. त्याचे नाव 'वेज-नॉन वेज' आहे. आनंद लवकरच मुंबईत या स्टोरची दुसरी ब्रॅण्च ओपन करणार आहेत. आनंद क्लोदिंग ब्रांड 'भाने'चे मालक आहेत. सोनम याच ब्रॅण्डचे कपडे पसंत करते. याशिवाय आनंद त्यांचा फॅमिली बिझनेस 'शाही एक्सपोर्ट्स'चे एमडी आहेत. सोनमची फ्रेंड प्रेरणा कुरैशी, आनंदची मैत्रीण आहे. तिच्या माध्यमातूनच दोघांची भेट झाली होती. 2014 मध्ये आनंद यांनी सोनमला प्रपोज केले होते. याचवर्षी हे दोघे लग्नाच्या बेडीत अडकले. 

 

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, अशाच आणखी काही अभिनेत्रींविषयी... 

बातम्या आणखी आहेत...