आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनिल कपूरच्या घरी करवा चौथ सेलिब्रेशनसाठी लाल जोड्यात पोहोचली रवीना टंडन, कपूर फॅमिलीने सर्वांसोबत केली पूजा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क. शनिवारी अनिल कपूरने बायको सुनीता कपूरसोबत मिळून करवा चौथच्या सेलिब्रेशनचे आयोजन केले होते. सेलिब्रेशनमध्ये बॉलिवूड सेलेब्स दिसले. करवा चौथ साजरी करण्यासाठी अनिलच्या घरी रवीना टंडन लाल जोड्यात पोहोचली. तिच्या हातात पूजेची थाळी होती. रवीनाने सिम्पल मेकअप केला होता आणि हेवी ईयररिंग्स कॅरी केल्या होत्या. तर संजय कपूरची बायको महीप कपूर डार्क पिंक कलरच्या आउटफिटमध्ये दिसली. तिने हेवी नेकलेस आणि ईयररिंग्स घातल्या होत्या. 


हे सेलेब्सही झाले सहभागी 
- या निमित्ताने अनिल कपूरची बायको सुनीता कपूर, नीलम, डायरेक्टर डेविड धवनची बायको लाली धवन आणि तिची सून जान्हवी धवन, कृषीका लुल्ला, रीमा जैनसोबतच अनेक सेलेब्सने मिळून करवा चौथची पूजा केली. गेल्यावर्षी श्रीदेवीही करवा चौथच्या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाल्या होत्या. आता त्या या जगात नाहीत. सर्वांनी श्रीदेवीला मिस केले.
- महीप कपूरने आपल्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये सर्व एकत्र बसलेले दिसत आहेत. त्यांनी फोटोवर कॅप्शन दिले की, 'मिस यू श्री'
- तर गुलशन कुमारची सुन दिव्या कुमार खोसलानेही करवा चौथ साजरी करण्याची तयारी सुरु केली. तिने पती भूषण कुमारसोबत एक रोमँटिक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये भूषणने दिव्याला कडेवर उचलले आहे. 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा सेलेब्सचे करवा चौथ सेलिब्रेशनचे फोटोज...

 

बातम्या आणखी आहेत...