आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Ravi Kishan Regrates That He Could Not Do 'Gangs Of Wasseypur' Movie, He Said, Anurag Did Not Give A Chance Because Of A Rumor'

रवि किशनला 'गँग्स ऑफ वासेपुर' चित्रपट न करू शकल्याची आहे खंत, म्हणाला - एका अफवेमुळे अनुरागने नाही दिली संधी' 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : बॉलिवूड आणि भोजपुरी सिनेमामध्ये आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांचे मन जिंकणारा अभिनेता रवी किशन नुकताच 'बाटला हाउस' मध्ये दिसला. एका कार्यक्रमात रवीला विचारण्यात आले की, अनुराग कश्यप त्याला त्यांच्या चित्रपटात का ठेवत नाही ? यावर रवीने सांगितले..., हो, खरंच नवल वाटतेय. मात्र मला जेव्हा याच्या मूळ कारणाची माहिती झाली तेव्हा मलाही आश्चर्य वाटले. खरं तर, लोकांनी माझ्याविषयी अफवा पसरवल्या आहेत की, मी सेटवर जास्त नखरे करतो, मी राजाप्रमाणे वागतो. मी याविषयी अनुरागलादेखील सांगितले. माझ्याविषयी अशा अफवा पसरल्या आहेत. 
 

रवीने पुढे सांगितले..  
त्यांनी मला 'मुक्काबाज' मध्ये घेतले. अनुराग अाधी मला 'गँग्ज ऑफ वासेपूर' मध्ये घेणार होते, मात्र अफवांमुळे त्यांनी मला घेतले नाही. याचे वाईट वाटले. इतक्या मोठ्या चित्रपटाचा मी भाग होऊ शकलो नाही, याचे मला दु:ख झाले. 
 

बातम्या आणखी आहेत...