आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Ravi Shankar Prasad Said I Am Ready To Talk To The Protesters Of Shaheen Bagh; I Will Remove Doubts About Citizenship Law

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शाहीन बागमधील आंदोलकांसोबत चर्चा करण्यास तयार, त्यांच्या मनातील नागरिकत्व कायद्यासंबंधी शंका दूर करणार- रविशंकर प्रसाद

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • शाहीन बागमध्ये नागरिकत्व संशोधन कायदा (सीएए)विरोधात 15 डिसेंबरपासून आंदोलन सुरू आहे
  • शाहीन बाग आणि जामिया यूनिव्हर्सिटीपासून सुरू झालेला विरोध दिल्लीतील 20 ठिकाणी होत आहे

नवी दिल्ली- केंद्रीय कायदे मंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज(शनिवार) शाहीन बागमध्ये सीएएविरोधात प्रदर्शन करत असलेल्या लोकांसोबत चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यांनी ट्वीट केले की, ठरलेल्या रूपरेषेनुसार शाहीन बागमधील आंदोलकांसोबत ते चर्चा करतील. यादरम्यान त्यांच्या मनातील सीएएसंबंधी शंकादेखील दूर केल्या जातील. शाहीन बागमध्ये नागरिकत्व संशोधन कायदा (सीएए)विरोधात 15 डिसेंबरपासून आंदोलन सुरू आहे. शाहीन बाग आणि जामिया यूनिव्हर्सिटीपासून सुरू झालेला विरोध दिल्लीतील 20 ठिकाणी होत आहे.

यापूर्वीच, गृह मंत्री अमित शाह यांनी दिल्लीतील एक निवडणूक रॅलीदरम्यान सीएएविरोधात शाहीन बागमध्ये होत असलेल्या आंदोलनावर वक्तव्य केले होते. ते म्हणाले होते की, बाबरपूरमध्ये ईव्हीएमचे बटन इतक्या जोरात दाबा की, याचा करंट शाहीन बागमध्ये बसेल. दुसरीकडे भाजप खासदार प्रवेश वर्मा म्हणाले होते की, सत्तेवर येताच सरकारी जमिनीवरील मशिदी हटवल्या जातील.

दिल्लीमध्ये 20 पेक्षा जास्त ठिकाणी सीएएविरोधात प्रदर्शन सुरू

दिल्लीमध्ये सीएए आणि एनआरसीविरोधात ठिकठिकाणी आंदोलन होत आहे. शाहीन बाग आणि जामिया यूनिव्हर्सिटीपासून सुरू झालेले हे आंदोलन आता दिल्लीतील 20 पेक्षा जास्त ठिकाणी होत आहे. दक्षिण पूर्व जिल्ह्यात गेट-7 जामिया यूनिव्हर्सिटी, शाहीन बाग रोड नंबर 13, लाला लाजपत राय मार्ग निजामुद्दीन, दक्षिण जिल्ह्यात दांडी पार्क हौज रानी मालवीय नगर, मध्य जिल्हा तुर्कमान गेट, उत्तर जिल्हा इंद्रलोक मेट्रो स्टेशन, डेअरी पार्क आजाद मार्केट जंगल वाली मशीद आणि शाही ईदगाहच्या ईस्ट गेटवर हे आंदोलन होत आहे.