आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्थ टेस्टमधील पराभवानंतर कोच शास्त्री आणि कर्णधार कोहली बनलेत टीकेचे धनी, त्याला रवी शास्त्रींनी असे दिले उत्तर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेलबर्न - ऑस्ट्रेलियाच्या विरोधात पर्थ टेस्टमध्ये मिळालेल्या पराभवानंतर क्रिकेटमधील तज्ज्ञ आणि और माजी खेळाडुंनी टीम इंडियावर टीकेची झोड उडवली. पण कोच रवी शास्त्री यांनी आता टीकाकारांना प्रत्युत्तर दिले आहे. हजारो किलोमीटर लांबून चुका काढणे सोपे असते, असे शास्त्री म्हणाले आहेत. दुसऱ्या कसोटीतील पराभवानंतर सुनील गावस्कर यांनी संघनिवड आणि मॅनेजमेंटवर प्रश्न उपस्थित केले होते. 


शास्त्री म्हणाले - जे योग्य असते तेच आम्ही करतो 
- शास्त्री म्हणाले की, लांबून कोणाची टीका करणे किंवा प्रश्न उपस्थित करणे सोपे असते. त्यांनी फार लांब बसून टीका केली आहे. आणि दक्षिण ध्रुवावर आहोत. टीमसाठी जे योग्य असते तेच आम्ही करतो. 
- 1983 मधील वर्ल्ड कप विजेत्या टीमचे सदस्य राहिलेले शास्त्री म्हणाले की, पर्थमधील पराभवाने आम्ही खचलेलो नाही. सगळ्यांना माहिती आहे की, दुसऱ्या कसोटीतही आमच्याकडे विजयाच्या अनेक संधी होत्या. मालिका अजूनही 1-1 च्या बरोबररी आहे आणि आम्ही पुढील मॅचसाठी तयार आहोत. 
- भारताने अॅडिलेडमध्ये पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा 31 धावांनी पराभव केला होता.  तर पर्थमधील दुसऱ्या कसोटीत भारताचा 146 धावांनी पराभव झाला होता. सिरीजची तिसरी कसोटी 26 डिसेंबरपासून मेलबर्नमध्ये होणार आहे. 

 

कोहलीचा केला बचाव 
शास्त्री यांनी कर्णधार कोहलीचाही बचाव केला. मैदानावर कोहलीच्या वर्तणुकीवर ऑस्ट्रेलियाच्या एक्सपर्ट्ने आक्षेप घेतला होता. शास्त्री म्हणाले ते शानदार होते. त्या वर्तनात काय चुकीचे होते. लोक काहीही म्हणत असले तरी आमच्या मते तो जेंटलमन आहे. 

बातम्या आणखी आहेत...