आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्पोर्ट्स डेस्क - भारतीय क्रिकेट टीमच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक महेंद्र सिंह धोनी आता वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधूनही संन्यास घेऊ शकतो. भारतीय टीमचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी गुरुवारी न्यूज-18 शी बोलताना ही शक्यता वर्तवली आहे. शास्त्री म्हणाले, "धोनी स्वतःला टीमवर लादत नाही. आमची चर्चा झाली. त्याने टेस्ट सामन्यांतून आधीच संन्यास घेतला. आता लवकरच तो वनडे इंटरनॅशनलमधून सुद्धा निरोप घेऊ शकतो. टी-20 वर्ल्ड कप तो खेळणारच आहे. तसेच आयपीएलमध्ये सुद्धा खेळतच आहे. यानंतर त्याचे शरीर कसे साथ देते हे पाहावे लागेल."
धोनी पुढे खेळणार की नाही हे आयपीएलच्या परफॉर्मन्सवर...
याच वर्षी ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या वर्ल्डकप टीमसोबत धोनी असणार आहे. टीमचा उप-कर्णधार रोहित शर्माने सुद्धा धोनी ऑस्ट्रेलियात खेळणार असल्याचे यापूर्वीच सांगितले होते. त्यात शास्त्रींनी भर घातली आहे. तरीही धोनीची पुढील वाटचाल त्याच्या आयपीएलमधील परफॉर्मन्सवरच विसंबून राहणार असे संकेत मुख्य प्रशिक्षक शास्त्री यांनी दिले आहेत. रवी शास्त्री पुढे म्हणाले- "मिड लेव्हलमध्ये निवड होण्यासाठी परफॉर्मन्स सर्वात महत्वाचा ठरतो. धोनी, ऋषभ पंत आणि संजू सॅमसन यांपैकी एकावर निर्णय घेतला जाईल. धोनी सध्या 5 व्या किंवा 6 व्या क्रमांकावर खेळत असतो. आयपीएलमध्ये त्याने चांगले परफॉर्म केल्यास त्याला टीममध्ये सामिल केले जाईल."
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.