आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Ravi Shastri On MS Dhoni Batting Position In World Cup Semi Final India Vs New Zealand

World Cup / सेमीफायनलमध्ये धोनीला सातव्या क्रमांकाला उतरवणे माझा नव्हे, अख्ख्या टीमचा होता निर्णय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंड विरुद्धच्या सेमीफायनलमध्ये महेंद्र सिंह धोनीला 7 व्या क्रमांकावर पाठवण्यावरूनचा वाद अजुनही सुरूच आहे. आता यावर भारतीय क्रिकेट टीमचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींनी स्पष्टीकरण दिले आहे. धोनीला उशीरा उतरवण्याचा निर्णय अगदी सामान्य होता. धोनीला लवकर पाठवावे आणि त्याने लवकर आऊट व्हावे असे आपल्याला वाटते काय? धोनी लवकर बाद झाला असता तर विजयाची अपेक्षाच ठेवता आली नसती असे रवी शास्त्री म्हणाले.

 

सेमीफायनलमध्ये पराभवानंतर सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांवर रवी शास्त्री यांनी इंडियन एक्सप्रेसला मुलाखत दिली. त्यामध्ये बोलताना रवी शास्त्री म्हणाले, "आम्हाला धोनीच्या अनुभवाची गरज होती. तो ऑल टाईम फिनिशर म्हणून ओळखला जातो. अशात त्याला आधीच बॅटिंगवर पाठवणे गुन्हा ठरला असता. यावर अख्ख्या टीमचे एकमत होते." यापूर्वी विराट कोहलीने म्हटले होते, की सुरुवातीच्या 45 मिनिटांतच झालेल्या वाइट खेळीमुळे भारत वर्ल्डकप सिरीजमधून बाहेर पडला.


मिडल ऑर्डरमध्ये मजबूत बॅट्समनची कमतरता भासली
मिडल ऑर्डरमध्ये चांगल्या बॅट्समनची कमतरता होती अशी कबुली शास्त्रींनी दिली आहे. ते म्हणाले, "मिडल ऑर्डरमध्ये एका मजबूत फलंदाजाची गरज होती. टीम इंडियाला त्याची कमतरता जाणवली. आता ही गोष्ट भविष्यातच करता येईल. कारण, सध्याची क्रमवारी पाहता आपण काहीच करू शकत नाही. धवन आणि त्यानंतर विजय शंकरला दुखापत झाली. त्यातून भारत सावरू शकला नाही."


सेमी फायनलमध्ये 24 धावांवर पडल्या होत्या 4 विकेट
सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडने भारताला विजयासाठी 240 धावांचे आव्हान दिले होते. लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात अतिशय वाइट ठरली. भारताचे टॉप-4 फलंदाज पहिल्या 10 ओव्हरमध्येच तंबूत परतले. टीमचा स्कोअर 24 होता. रोहित शर्मा, विराट कोहली, लोकेश राहुलनंतर दिनेश कार्तिक देखील बाद झाला. पाचव्या क्रमांकावर उतरलेल्या ऋषभ पंत आणि सहाव्या क्रमांकावर आलेल्या हार्दिक पंड्याने सुद्धा प्रत्येक 32-32 धावाच काढल्या.

बातम्या आणखी आहेत...