आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षपदी रवी शास्त्रींची परत एकदा वर्णी, 2021 पर्यंत असेल त्यांचा कार्यकाळ

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट डेस्क- अनेक दिवसांपासून भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक पदी कोण असेल याची अनेकांना उत्सुकता होती. रवी शास्त्री यांचा कार्यकाळ संपल्यानंतर अनेकांनी प्रशिक्षक पदासाठी अर्ज दाखल केले होते. अखेर या नाट्यावरून पडदा उठला आहे. कपिल देव यांच्या अध्यक्षतेखाली निवडण्यात आलेल्या समितीने भारतीय संघाच्या नव्या प्रशिक्षकाची आणि मुख्य स्टाफच्या नावाची घोषणा केली. यांची भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षकपदी रवी शास्त्रींची पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. 2017 मध्ये याआधी रवी शास्त्री यांची निवड झाली होती. दरम्यान विश्व चषकामधील पराभवानंतरही रवी शास्त्री यांची निवड करण्यात आली आहे.

कपिल देव यांनी सकाळी मुलाखती घेण्यास सुरुवात केली. या समितीमध्ये माजी क्रिकेटर अंशुमन गायकवाड आणि माजी महिला क्रिकेटर शांता रंगास्वामी यांचा समावेश आहे. प्रशिक्षक पदासाठी रवी शास्त्री, रॉबीन सिंग, लालचंद राजपूत, माईक हेसन, टॉम मूडी यांच्यात लढत होती. मुलाखतीच्या आधीच अफगाणिस्तानचे प्रशिक्षक फिल सिमन्स यांनी या शर्यतीतून माघार घेतली होती. प्रशिक्षक पदासोबतच इतर स्टाफच्या नावांचीही आज घोषणा करण्यात आली.
 
प्रशिक्षक रवी शास्त्रींचा वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी कार्यकाळ वाढवण्यात आला होता. शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरच्या मैदानावर भारतीय संघाने नमवले होते. जुलै 2017 मध्ये शास्त्रींच्या मार्गदर्शनाखाली भारताने 21 कसोटी सामने खेळले त्यातील 13 सामन्यात विजय मिळवला. तर, टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 36 सामन्यांपैकी 25 सामन्यात विजय मिळवला. पण रवी शास्त्रींच्या नेतृत्वाखाली भारताला विश्वचषक जिंकता आला नाही. तरीदेखील ऑस्ट्रेलियामध्ये ऐतिहासिक विजय आणि भारताच्या आयसीसी रॅकिंगमुळे रवी शास्त्रींच्या नावावर शिक्कामोतर्ब झाला.
 

प्रशिक्षक होण्यासाठीच्या अटी
बीसीसीआयने तीन महत्त्वाच्या अटी घातल्या होत्या. प्रमुख प्रशिक्षकाचे वय 60 वर्षांपेक्षा कमी असावे तसेच किमान 2 वर्षांचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव असायला हवा. मुख्य प्रशिक्षकाकडे कसोटी खेळणाऱ्या देशाला दोन वर्ष प्रशिक्षण दिल्याचा अनुभव असायला हवा किंवा असोसिएट सदस्य, ए टीम, आयपीएल टीम यापैकी एकाला कमीत कमी तीन वर्ष प्रशिक्षणाचा अनुभव असायला हवा. भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक होण्यासाठी महत्त्वाची अट ही असणार आहे की, त्याने किमान 30 आंतरराष्ट्रीय कसोटी किंवा 50 एकदिवसीय खेळलेले असावे.

बातम्या आणखी आहेत...