आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Ravichandran Ashwin Fails In Fitness Test Will Miss Sydney Test

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फिटनेस टेस्टमध्ये फेल झाला आर अश्विन, कसोटी मालिकेतील अखेरचा सामनाही खेळू शकणार नाही

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - भारताचा आघाडीची स्पिनर रविचंद्रन अश्विन ऑस्ट्रेलियाच्या विरोधातील सिडनीतील अखेरच्या कसोटीतून बाहेर पडला आहे. अश्विन फिटनेस टेस्ट पार करू शकला नाही. अश्विन 100% फिट नसल्याने निवडीसाठी त्याच्या नावाचा विचार केला जाणार नाही. कर्णधार विराट कोहलीने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. कोहली म्हणाला, अश्विन फिट नाही ही टीमसाठी वाईट बातमी आहे. पण तो दीर्घकाळासाठी फिट व्हावा असे आम्हाला वाटते. 


यापूर्वीच्या दोन कसोटीही खेळू शकला नाही अश्विन
पेटाच्या स्नायूमध्ये असलेल्या त्रासामुळे अश्विन अॅडिलेट कसोटीनंतर बाहेर पडला होता. त्यानंतर तो पर्थ आणि मेलबर्न कसोटी खेळू शकला नाही. त्याच्या जागी रविंद्र जडेजाला संघात स्थान मिळाले होते. त्याने पाच विकेट घेतल्या होत्या. 


विराटने हनुमा विहारीहा अश्विनचा पर्याय अशल्याचे सांगत म्हटले की, हनुमाने ज्याप्रकारे गोलंदाजी केली ते कौतुकास्पद आहे. त्याने योग्य टप्प्यावर चेंडू फेकला. तो चांगला पर्याय ठरू शकतो. तो गोलंदाजी करतानाच असे वाटत असते की, तो विकेट घेणार आहे. विहारीने तीन कसोटींत पाच विकेट्स घेतल्या आहेत. 


सिडनी कसोटीसाठीचा 13 सदस्यांचा संघ
विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य राहाणे (उप-कर्णधार), लोकेश राहुल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, ऋषभ पंत (विकेटकीपर), रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, जसप्रित बुमराह, उमेश यादव