आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सन्मानजनक जागा द्या, अन्यथा स्वतंत्र लढणार; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा महाआघाडीला इशारा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाशीम- भाजपविरोधी विचारांच्या पक्षांनी एकत्र येत या शेतकरीविरोधी सरकारला घरी पाठवावे, असे  जनतेच्या मनात आहे.  मात्र, काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाआघाडी स्वाभिमानी शेतकरी पक्षाला केवळ १ जागा देणार असल्याचे माध्यमांतून कळत आहे. भाजपविरोधात जायचे म्हणून कुणाच्याही मागे आम्ही फरपटत जाणार नाही. सन्मानजनक जागा दिल्या तरच महाआघाडीसाेबत जाऊ, अन्यथा स्वतंत्र लढू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिला.  

 

तुपकर म्हणाले, ‘आम्ही भिकेचा कटाेरा घेऊन उभे नाही, स्वाभिमानी शेतकरी आहाेत. त्यामुळे आम्हाला गृहीत धरून चालू नये. हातकणंगले, बुलडाणा, वर्धा, म्हाडा, धुळे, नंदुरबार, काेल्हापूर या जागा आम्ही लोकसभेसाठी मागितल्या. सन्मानजनक जागा दिल्या तरच आम्ही महाआघाडीत जाऊ, अन्यथा आम्हीच लहानमोठ्या पक्षांना साेबत घेऊन निवडणुकांना सामाेरे जाण्याची आमची तयारी आहे. सरकार दुष्काळाच्या अंमलबजावणीत अपयशी ठरले. कर्जमाफी, नाफेडचा पैसा शेतकऱ्यांना मिळालेला नाही. नाफेडला विक्री केलेल्या तूर व हरभऱ्याचे पैसे अद्यापही मिळाले नाहीत. काही शेतकऱ्यांची ऑनलाइन तर काहींची ऑफलाइन नाेंदणी हाेऊन ८ महिने झाले. तरी शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नाहीत. सर्व शेतकऱ्यांना त्यांचे पैसे मिळत नाहीत, ताेपर्यंत स्वाभिमानी संघटना आपले आदाेलन सुरूच ठेवेल,’ असे ते म्हणाले.    

 

सरकारला सत्तेवरून खेचण्यास सज्ज : 
जनतेची फसवणूक करण्याचा पंचवार्षिक कार्यक्रमच सरकारने राबवला आहे. हे सरकार जनता, शेतकऱ्यांना प्रचंड यातना देत आहे. आता तर साेशल मीडियावरही सरकारचा वाॅच असणार आहे. त्यामुळे सामान्यांच्या अभिव्यक्तीवरच घाला सरकार घालणार आहे. सरकारने सत्तेवर येताना दिलेली कोणतीही आश्वासने आता सत्ता जाण्याची वेळ आली, तरी पूर्ण केलेली नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांचं वाटोळं करणाऱ्या सरकारला घालवण्यासाठी आम्ही सज्ज आहाेत,’ असे तुपकर म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...