आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • Ravina Tandon, Angry At Manish Paul On The Set Of Nach Baliye 9 Show, Throws Out A Mic And Gets Out From Set

नच बलिए 9 या शोच्या सेटवर मनीष पॉलवर रागावली रवीना टंडन, माइक फेकून सेटवरून निघून गेली

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्ही डेस्क : अभिनेत्री रवीना टंडन डान्सिंग रियलिटी शो 'नच बलिए 9' मध्ये जज म्हणून दिसली होती. एका लेटेस्ट एपिसोडच्या शूटिंगदरम्यान शोचा होस्ट मनीष पॉलसोबत तिचा वाद झाला. ज्यामुळे ती एवढी नाराज झाली की, तिने माइक फेकला आणि ती सेटवरून निघून गेली. आणि जाऊन आपल्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये बसली. सांगितले जाते आहे की, घटनेनंतर शूटिंग सुमारे एक तास थांबले होते.
 

मनीषचे वर्तन पाहून आला राग... 
सेटशी निगडित सूत्रांनी सांगितले की, "रवीनाने ईअरफोन लावलेले होते, ज्याद्वारे तिला कंट्रोल रूममधून इंस्ट्रक्शंस मिळत होते की, तिला स्पर्धक श्रद्धा आर्य आणि त्याच्या पार्टनर आलम मक्करला कोणते प्रश्न विचारायचे आहेत. याचदरम्यान तिला मनीष काही विचित्र वर्तन करताना दिसला. रवीनाला वाटले की, तो तिला विद्वान आहे. मात्र वास्तविक तसे नव्हते. जसा कॅमेरा बंद झाला, रवीनाने मनीषला खूप काही ऐकवले. तिने स्पष्टपणे त्याला सांगितले की, त्याने अशाप्रकारच्या हरकती करू नये, विशेषतः तेव्हा जेव्हा ती आपले मत मांडत असेल."
 

मनीषच्या उलट उत्तराने रवीनाचा राग आणखी वाढला... 
सूत्रांनी पुढे सांगितले की, "रवीना यांचे बोलणे ऐकून मनीष हैराण झाला. त्याने अभिनेत्रीला उलट उत्तर दिले की, तो आपले काम करत आहे. आणि तिने आपले काम केले पाहिजे. तो बोलता बोलता अभिनेत्रीला हेदेखील म्हणाला की, तो तेच करतो जे त्याला सांगितले गेले आहे आणि कुणीही त्यामध्ये बोलण्याची गरज नाहीये. मनीषचे हे बोलणे ऐकून रवीनाचा राग आणखी वाढला. ती आपला माइक फेकून सेटवरून बाहेर पडली आणि आपल्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये जाऊन बसली. तिने शूट करायला नकार दिला." 
 

रवीनानंतर मनीषनेदेखील सोडला सेट... 
दुसरीकडे मनीष काही वेळ स्टेजवर थांबला मात्र जेव्हा त्याने पहिले की, रवीना सेटवर परतली नाही. तेव्हा तोही तिथून निघून गेला. तब्बल एक तास शूटिंग थांबले होते. प्रोडक्शन हाउसच्या मेंबर्सने दोघांचीही खूप मनधरणी केली, तेव्हा कुठे ते सेटवर परतले आणि आपल्या वाट्याचे शूटिंग पूर्ण केले."

बातम्या आणखी आहेत...